पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जीच होणार मुख्यमंत्री-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील, तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येईल. भाजपने जी काही मेहनत केली, त्यांनी जी काही बांधणी केली ते नक्कीच कौतुकास्पद आहे. मात्र ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील याची खात्री आम्हाला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले संजय राऊत?

भाजपच्या नियोजनाचं कौतुक केलं पाहिजे. कोरोना काळ होता तरीही देशाचे पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले. देशाचे गृहमंत्री गेले. हे सगळं कौतुकास्पद आहे. मात्र पश्चिम बंगाल जिंकणार ममता बॅनर्जीच. कदाचित बहुमत थोडंसं कमी होईल.. मात्र सत्ता ममतांचीच येईल याचा विश्वास आम्हाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

राज्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंगालमध्ये गेले होते. भाजपला या सगळ्याचा नक्कीच फायदा होईल. संध्याकाळी जेव्हा संपूर्ण निकाल जेव्हा हाती येतील तेव्हा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील याचा विश्वास वाटतो कारण बंगालमधून त्यांना हरवणं सोपं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मी पुन्हा सांगतो… मोदी खूप लोकप्रिय आहेत पण बंगालमध्ये विजय ममता दीदींचाच, तो देखील फार मोठा

ADVERTISEMENT

पश्चिम बंगालसह पाच राज्यांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. कारण हा लढा थेट मोदी विरूद्ध दीदी असा होता. ममता बॅनर्जींविरोधात ही लढाई भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मात्र जे कल आणि निकाल हाती येत आहेत त्यातून तृणमूल काँग्रेस बाजी मारणार हे स्पष्ट झालं आहे.

ADVERTISEMENT

“बंगालमध्ये BJP ने १०० जागा जिंकल्यास राजकीय अंदाज वर्तवणं सोडेन”

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काय म्हटलं होतं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते आहेत. मात्र भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार नाही. बंगालमध्ये भाजपने 100 जागा जिंकल्या तर मी राजकीय अंदाज वर्तवणं सोडून देईन असाही दावा प्रशांत किशोर यांनी केला होता. 2 मे रोजी जे निकाल लागतील त्यात तृणमूल काँग्रेसचाच विजय होईल. भाजपला 100 हून अधिक जागा मिळणार नाहीत. 2 मे रोजी हे सगळं आपण पाहूच, काही प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये मतांचं ध्रुवीकरण होईल. तिथे अँटी इन्कबन्सी हा देखील मुद्दा आहे. स्थानिक पातळीवर भाजपचं संघटनही मजूबत आहे. तरीही ममता बॅनर्जीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हा विश्वास मला वाटतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT