मंत्रालायातल्या कर्मचाऱ्यांना Jeans घालण्याची मुभा , टी शर्टवरची बंदी मात्र कायम
मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना जीन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही असा आदेश ठाकरे सरकारने डिसेंबर २०२० महिन्यात काढला होता. या आदेशात आता सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या सुधारणेनुसार आता मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना आता जीन्स घालण्याची मुभा देण्यात आली आहे. टी शर्ट घालण्यावरची बंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. आदेशातल्या या सुधारणेमुळे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. […]
ADVERTISEMENT
मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना जीन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही असा आदेश ठाकरे सरकारने डिसेंबर २०२० महिन्यात काढला होता. या आदेशात आता सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या सुधारणेनुसार आता मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना आता जीन्स घालण्याची मुभा देण्यात आली आहे. टी शर्ट घालण्यावरची बंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. आदेशातल्या या सुधारणेमुळे मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
काय होता डिसेंबर २०२० मधला आदेश?
हे वाचलं का?
शासकीय कर्मचाऱ्यांना नवा ड्रेस कोड लागू करण्यात आला. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घातले पाहिजेत याबद्दलचे नियम सरकारने जाहीर केले. मंत्रालयाने त्यावेळी दिलेल्या निर्देशांनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स टीशर्ट घालता येणार नाही तसंच स्लीपर्सही वापरता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं. महिला कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड ठरवून देण्यात आला. महिलांनी कार्यालयात येताना साडी नेसावी किंवा कुर्ता सलवार, चुडीदार-दुपट्टा घालणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याच प्रमाणे एकदा म्हणजेच दर शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असंही नियमांत स्पष्ट करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
काय सुधारणा करण्यात आली आहे?
ADVERTISEMENT
कर्मचाऱ्यांनी टीशर्ट आणि जीन्स घालू नये या नियमात बदल करण्यात आला आहे. टी शर्ट घालू नये एवढीच सुधारणा जुन्या नियमात करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या बदलानुसार जीन्स घालण्याची मुभा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. या नव्या सुधारणेमुळे आता मंत्रालयातील सरकारी कर्मचाऱ्यांना जीन्स घालण्याची संमती मिळाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT