प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा, आर्या आंबेकर भडकली, सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण
सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमातून समोर आलेली आर्या आंबेकर सध्या मराठी सिने आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीतली आघाडीची गायिका मानली जाते. अनेक चित्रपटांसह मालिकांमध्ये आर्या पार्श्वगायन करते. सध्या ती सा रे ग म प मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. काही वर्षांपासून आर्या आंबेकर सिने इंडस्ट्रीतल्या एका प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराला डेट करत असल्याच्या चर्चा […]
ADVERTISEMENT
सा रे ग म प लिटील चॅम्प्स या कार्यक्रमातून समोर आलेली आर्या आंबेकर सध्या मराठी सिने आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीतली आघाडीची गायिका मानली जाते. अनेक चित्रपटांसह मालिकांमध्ये आर्या पार्श्वगायन करते. सध्या ती सा रे ग म प मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. काही वर्षांपासून आर्या आंबेकर सिने इंडस्ट्रीतल्या एका प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
ADVERTISEMENT
अखेरीस आर्याने या सर्व चर्चा आणि अफवांवर आपलं मौन साडलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट टाकत आर्याने याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय. “मी यापूर्वीही अशा चर्चांकडे दुर्लक्ष केलं आहे. मात्र नुकताच मला प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये असा एक मेसेज आला. माझ्या ओळखीच्या व्यक्तींसंदर्भात हे बोललं जात असल्यामुळे मी स्पष्टीकरण देत आहे.”
मी एका नावाजलेल्या व्यक्तीला डेट करत असल्याची अफवा बऱ्याच काळापासून ऐकायला मिळत आहे. मी पुन्हा एकदा सांगते की ते माझे मार्गदर्शक आहेत. या अफवा पसरवल्या जात असल्या तरीही मला त्यांच्याबद्दल आदर आणि कौतुक आहे असं आर्याने स्पष्ट केलंय.
हे वाचलं का?
याचसोबत मी सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारे वेगळे प्रयत्न करत नाही. माझं सोशल मीडिया अकाऊंट कोणतीही टॅलेंट मीडिया एजन्सी मॅनेज करत नाही. माझे फॉलोअर्स आणि व्ह्यूज हे ऑर्गेनिक असल्याचं आर्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT