चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : कलम वाचून राजू शेट्टी संतापले; सरकारची तालिबानशी तुलना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेते प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचीही एन्ट्री झाली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या संशयितांवर पोलिसांनी लावलेली कलम वाचून त्यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. तसंच सरकारची थेट तालिबानशीही तुलना केली.

ADVERTISEMENT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी दुपारी पिंपरी-चिंचवडमध्ये एका अज्ञाताने शाईफेक केली. हा समता परिषदेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत सहभागी एकूण ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याविरोधात चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यात लावण्यात आलेली कलम वाचून राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले राजू शेट्टी?

शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे! पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानी सारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न व ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का? मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांवर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत.

कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल?

या शाईफेक प्रकरणात मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना अटक करण्यात आली आहे. आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर भादवि कलम 307 ,353, 294, 500, 501, 120 (ब) 34 क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट ऍक्ट कलम 7 महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37(1) आणि 135 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT