मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल, ‘या’ तारखेला होणार शस्त्रक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही दिवसांपासून त्यांना पायाचं दुखणं जाणवतं आहे. त्यांच्या हिपबोनची शस्त्रक्रिया होणार असल्याचं त्यांनी पुण्यातल्या सभेतच सांगितलं होतं. आता १ जून रोजी राज ठाकरे यांच्यावर ही शस्त्रक्रिया होणार आहे. राज ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. पायाचा त्रास बळावल्याने त्यांनी ५ जूनचा अयोध्या दौराही रद्द केला.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंवर १ जून रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. २ एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. मशिदींवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्येला जाण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यांच्या पायावर आता शस्त्रक्रिया होणार आहे.

राज ठाकरे म्हणाले, ‘मनसैनिकांच्या काळजीपोटी अयोध्या दौरा रद्द केला; शिव्याही खायल्या तयार..’

हे वाचलं का?

राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे ही शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी उद्या म्हणजेच ३१ मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जातील. त्यानंतर १ जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर त्यांना दोन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पुण्यातल्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?

ADVERTISEMENT

”मी काही दिवसांपूर्वी पुण्यात आलो त्यावेळी माझं पायाचं दुखणं बळावलं. मी दोन दिवस पुण्यात काही नव्हतं म्हणून मुंबईला गेलो. त्या दरम्यान डॉक्टरांशी बोललो. फिजिओथेरेपी वगैरे घेतली. पण जरा प्रकरण वाढलं असल्याने १ जूनला शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया माझ्या हिपबोनची होणार आहे. हे का सांगितलं? कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो तर आमचे पत्रकार बांधव कुठचा अवयव बाहेर काढतात भरवसा नाही. सगळी ओढाताण करण्यापेक्षा आपण सांगून टाकावं कसं ऑपरेशन आहे. ”

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी दौरा रद्द करण्याचं नेमकं कारण काय?

‘अयोध्या दौरा तूर्तास रद्द.. अनेकांना वाईट वाटलं.. अनेकांना आनंद झालं, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले. म्हणून मी दोन दिवसांचा जरा बफर दिला होता मुद्दामून. काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेन. ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकरची घोषणा केली त्यानंतर मी पुण्यात अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसातच हे सगळं प्रकरण सुरु झालं. की, अयोध्येला येऊ देणार नाही.’

‘मग ते सगळं वाढत होतं. मी ते सगळं पाहत होतो. काय चाललंय नेमकं. मला मुंबई, दिल्लीमधून देखील माहिती मिळत होती. मला उत्तर प्रदेशातून देखील काही गोष्टी लोकं सांगत होते. की नेमकं काय चाललंय. एक वेळ अशी लक्षात आली की, हा संपूर्ण ट्रॅप आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे.’

‘कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली त्याची रसद पोहचवली गेली ज्या गोष्टी गेल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालीए. की, पुन्हा विषय बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून सगळा आराखडा आखला गेला.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT