उद्धव ठाकरे, मुकेश अंबानी, सचिन वाझे आणि अँटेलिया प्रकरणी राज ठाकरे म्हणतात..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

. उद्धव ठाकरे आणि व्यावसिक मुकेश अंबानी यांच्यातले परस्पर संबंध खूप चांगले आहेत. सचिन वाझे पोलीस खात्यात आल्यानंतर निलंबित झाला होता, त्यानंतर त्याला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. सचिन वाझे हा देखील उद्धव ठाकरेंच्या जवळचा आहे. अशात प्रश्न हा आहे की मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाने म्हणजेच सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली? मूळ प्रश्न हा आहे. त्याचं उत्तर काय ते काहीच कळत नाही असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगबादमध्ये केलं आहे. आज राज ठाकरेंना सचिन वाझेसंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100 कोटी खंडणीचं टार्गेट दिलं नव्हतं, पैसेही घेतले नाहीत-सचिन वाझे

काय म्हणाले आहेत राज ठाकरे?

हे वाचलं का?

आपण मूळ विषय बाजूला ठेवतो आहे. नको त्या विषयांमध्ये सगळं प्रकरण फिरवलं जातं. तुमचा (माध्यमांचा) वापरच केला जातो आहे. जे तुम्हाला दिलं जातं ते तुम्ही छापता. आता ते आर्यन खान प्रकरण 28 दिवस सुरू होतं. 28 दिवस हे प्रकरण चघळण्यात आलं. नंतर कुणी विचारलंही नाही आर्यन खानला. सुशांतसिंग प्रकरणातही असंच घडलं.

एक लाख एसटी कर्मचारी आहेत, अंगावर आले तर सरकार काय करेल?-राज ठाकरे

ADVERTISEMENT

आता मुकेश अंबानी हे जर उद्धव ठाकरेंच्या इतके जवळचे आहेत तर त्यांच्या घराखाली उद्धव ठाकरेंच्या जवळची व्यक्ती असलेल्या सचिन वाझेने स्फोटकांची कार का ठेवली? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर ज्यादिवशी मिळेल आणि ते खरं उत्तर मिळालं तर फटाक्यांची माळ लागेल या आपल्या आधीच्या वक्तव्याचाही त्यांनी पुनरूच्चार केला.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख, त्यांच्यावर झालेले आरोप हे सगळं 25 हजार फुटांवरचं विमान दिसतं तसं आहे. मुळात हे प्रकरण घडलं का? याच्या मुळाशी कुणी गेलेलंच नाही. त्याचं उत्तर ज्या दिवशी मिळेल त्यावेळी फटाक्यांची माळ लागेल.

आपल्याकडे माध्यमंही काय चालवतात? सुशांत सिंग प्रकरण, आर्यन खान प्रकरण नंतर ते सगळं सोडून देतात. परवा लोकसभेत ही माहिती देण्यात आली की पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडला. पाच लाख व्यावसायिक जेव्हा देश सोडतात तेव्हा नोकऱ्यांवर त्याचा कसा परिणाम होतो? हे कुणीच दाखवत नाही.

सरकार पडेल असं वाटत नाही

भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं बोललं जात आहे, या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आताचं एकूण हे तिघांचं सरकार पाहता, काही आता सरकार पडेल असं मला वाटत नाही. तसेच, मला वैयक्तिक कुठले कोणाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत. घोटाळ्यांपेक्षा कोणच्या घरात मला डोकवायचं नाही. या सगळ्यामध्ये एकटे किरीट सोमय्या… ते पूर्वीपासून हेच करत आहेत, त्या सगळ्या गोष्टींची देखील उत्तरं सापडत नाहीत. महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते, त्यासाठी म्हणून आपण शॅडो मंत्रिमंडळ निर्माण केलं मात्र त्याचवेळी नेमका लॉकडाउन लागला. या करोनाच्या काळात आमच्या अनेक लोकांनी प्रचंड काम केलं. परंतु ते प्रचंड का हे सोशल मीडियावरतीच राहिलं असंही राज यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT