उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलं आहे की त्यांच्यावर राज्य आलं आहे? राज ठाकरेंचा मिश्कील प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडी सरकारच्या सव्वा वर्षाच्या काळात दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले. इतरही अनेक प्रकरणं बाहेर आली. या सरकारच्या कामापेक्षा त्यांची बदनामीच जास्त होते आहे. त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे म्हणाले की मला परवा कुणीतरी एक चांगला विनोद पाठवला.. ‘उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलं आहे की त्यांच्यावर राज्य आलं आहे?’ राज ठाकरेंनी हा उल्लेख करताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोरोना, लॉकडाऊन आणि राज्यातली परिस्थिती या विषयावर पत्रकार परिषद घेतली.

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी राज्यातील वाढता कोरोना, लॉकडाऊन आणि त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा यावर भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झूम मिटिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेत राज ठाकरेंनी अनेक सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या. शेतकऱ्यांना मदत करणं असेल, सलून चालवणं असेल, इतर अनेक प्रश्नांबाबत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सूचना केल्या. या सूचना उद्धव ठाकरेंनी सकारात्मकपणे घेतल्या आहेत. या सूचनांवर विचार करून योग्य तो निर्णय घेऊ असंही उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. “सध्या दहावी-बारावीचे विद्यार्थी कोणत्या मानसिकतेमधून जात असतील याची आपल्याला कल्पनाही नाही. कुठून अभ्यास करणार, कशी परीक्षा देणार, त्याला निकाल कधी लागणार..कसा लागणार याची आपल्याला कल्पनाही नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सरळ प्रमोट करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही प्रमोट करण्यात यावं.”

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा – राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हे वाचलं का?

दहावी बारावीच्या मुलांबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

“सध्या दहावी-बारावीचे विद्यार्थी कोणत्या मानसिकतेमधून जात असतील याची आपल्याला कल्पनाही नाही. कुठून अभ्यास करणार, कशी परीक्षा देणार, त्याला निकाल कधी लागणार..कसा लागणार याची आपल्याला कल्पनाही नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सरळ प्रमोट करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही प्रमोट करण्यात यावं.”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT