शिवसेना राष्ट्रवादीची ढ टीम – आदित्य ठाकरेंच्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपला सॉफ्ट कॉर्नर दाखवत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीचा घेतलेला समाचार आणि त्यानंतर महाविकास आघाडीची राज ठाकरेंवर टीका हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपले काका राज यांच्या मनसेवर भाजपची सी टीम असल्याची टीका केली. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपला सॉफ्ट कॉर्नर दाखवत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीचा घेतलेला समाचार आणि त्यानंतर महाविकास आघाडीची राज ठाकरेंवर टीका हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपले काका राज यांच्या मनसेवर भाजपची सी टीम असल्याची टीका केली.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मनसेकडून संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची ढ टीम असल्याची टीका देशपांडे यांनी केली आहे.
राज ठाकरेंच्या भाषणाचं अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून कौतुक, म्हणाली…
हे वाचलं का?
मनसेवर टीका करताना काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
आमचं हिंदुत्व हे लोकांना दिलेली वचन पूर्ण करण्याचं आहे. ज्या पक्षाचा तुम्ही उल्लेख केलाय त्यांना मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो. पण आता त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम ही एमआयएमची आहे आणि सी टीम मनसे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मनसेवर थेट हल्लाबोल केला. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. “जो पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी मनसेला लगावला.
ADVERTISEMENT
संदीप देशपांडेंचंही प्रत्युत्तर –
ADVERTISEMENT
शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसची ढ टीम आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे भाजप आणि मनसे युतीचा आता कोणताही प्रस्ताव नाहीये. भविष्यात काय होईल हे आता सांगता येणार नाही. परंतू मनात सारक्षा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसाक्षीने व्यभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत, आणि आमच्या अफवा जरी उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे जरा फारचं झालं.
पवारांनी कितीवेळा रंग बदललेत?; भाजपचं इतिहासाचे दाखले देत प्रत्युत्तर
भोंग्यांवरुन सुरु झालेल्या राजकारणावरुन मनसेचा शिवसेनेला टोला –
राज ठाकरेंनी भाषणात हनुमान चालीसा स्पीकरवर लावण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी याला सुरुवातही केली. परंतू पोलिसांनी कारवाई करत हे लाऊडस्पीकर जप्त करत मनसे कार्यकर्त्यांना दंड ठोठावला. यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला.
‘मी मनसेला आधी टाइमपास टोळी म्हणायचो, पण आता…’, आदित्य ठाकरेंची काकांच्या पक्षावर बोचरी टीका
पोलीस असे किती वेळेला आम्हाला दंड ठोठावणार आहेत? आणि हे सर्व लाऊडस्पीकर ते कुठे ठेवणार आहेत? आणि आम्हाला दंड ठोठावतंय तरी कोण? बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. मनसेचे जरीही आमदार-नगरसेवक निवडून येत नसले तरीही आम्ही आमच्या तत्वांशी कधीत तडजोड केली नाही, असं देशपांडे म्हणाले.
शिवसेना पक्ष सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडीत आहे, ज्यांची हिंदुत्वावर काहीही ठाम भूमिका नाही. निवडणुकीआधी शिवसेना भाजपसोबत युतीत होती आणि त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढल्या. निवडणुकांचे निकाल लागले तस त्यांनी तडजोड करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करत जनमताचा अनादर केला. लोकं हे सर्व पाहत आहेत, परंतू मनसे पहिल्यापासून आपल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम आहे, असं देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT