उत्तरसभेत राज ठाकरेंनी राऊतांना पुन्हा डिवचलं, म्हणाले हे तर लवंडे !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Shivsena (UBT) Leader reply to MNS Leader Raj Thackeray on Uddhav Thacekray criticism
Shivsena (UBT) Leader reply to MNS Leader Raj Thackeray on Uddhav Thacekray criticism
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यात उत्तर सभेत बोलत असताना आपल्यावरील आरोपांची सडेतोड प्रत्युत्तर दिलं. गुढीपाडव्याच्या सभेत बोलत असताना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा काढणाऱ्या राज ठाकरेंवर संजय राऊतांनी टीका केली होती. शिवाजी पार्कात भाजपचे भोंगे वाजत होते असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी पुन्हा डिवचलं आहे. प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला आहे.

ADVERTISEMENT

ईडीने संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर पत्रकार परिषदेत राऊतांचा रौद्रावतार पहायला मिळत होता. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्यांबद्दल भाष्य करताना संजय राऊतांनी शिव्यांचा वापर केला. यावर बोलताना राज ठाकरेंनी, “नुसत्या प्रॉपर्टी जप्त केल्या तर हे लागले शिव्या द्यायला. संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? आमच्या आजोबांनी म्हणजेच प्रबोधनकारांनी अशा लोकांसाठी एक चांगला शब्द शोधला आहे. तो म्हणजे लवंडे…नीट शब्द पाहा अनुस्वार व वर आहे”, असं म्हणत संजय राऊतांना डिवचलं.

आमच्या शेपटाला आग लावाल तर तुमची लंका जाळू – उत्तर सभेत संदीप देशपांडे कडाडले

हे वाचलं का?

गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी केलेल्या भाषणावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीका करताना राज ठाकरे भाजपची स्क्रिप्ट वाचत असल्याचं म्हटलं होतं. याआधी पुण्यात पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत असतानाही राज ठाकरेंनी संजय राऊतांची नक्कल केली होती. त्यामुळे संजय राऊत आता याला काय उत्तर देणार आणि येणाऱ्या काळात राज ठाकरेंच्या उत्तर सभेचे राज्याच्या राजकारणात कसे पडसाद उमटतात हे पहावं लागणार आहे.

तुमच्या उमेदवाराला पाडून 15 वर्ष नगरसेवक– उत्तर सभेत वसंत मोरेंचा चंद्रकांतदादांवर निशाणा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT