नालेसफाईचं कमिशन मिळालं नाही म्हणून लांडेंना राग आला असेल – मनसेची खोचक प्रतिक्रीया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नालेसफाई न झाल्यामुळे कंत्राटदाराला रस्त्यावर बसवून त्याच्या अंगावर कचरा टाकल्यामुळे शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीपमामा लांडे चांगलेच चर्चेत आले. सोशल मीडियावर आमदार लांडेंचा हा प्रताप व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली आहे. दिलीप लांडे पूर्वी ज्या पक्षात होते त्या मनसेनेही दिलीप लांडेंच्या या प्रतापावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे.

ADVERTISEMENT

नालेसफाई न झाल्यामुळे कंत्राटदारावर कचरा टाकला, शिवसेना आमदार दिलीप लांडेंचा प्रताप

“गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे अधिकारी, नेते, महापौर शहरात नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावा करत आहेत. जर नालेसफाई झाली असेल तर मग हा गाळ आला कुठून? लांडेंचं म्हणाल तर त्यांना नालेसफाईमधलं कमिशन मिळालं नसेल म्हणून राग आला असेल. तुम्ही सत्तेत आहात, आमदार आहात…मग वॉर्ड ऑफिसरला सांगून कंत्राटदारावर कारवाई का नाही करायला लावली? त्याऐवजी हे धंदे का करताय”, असं म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलीप लांडेंना टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

हिंदमाता परिसरात पाणी साचलं त्याला स्मृती इराणी जबाबदार – शिवसेना खासदार राहुल शेवाळेंचा दावा

दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनीही आमदार लांडेंवर टीका केली आहे. राम कदम यांनी ही शिवसेनेची नौटंकी असल्याचं म्हटलंय. शिवसेना महापालिकेत सत्तेत आहे. दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जातो. आज शिवसैनिक रस्त्यावरुन येऊन कंत्राटदाराला मारहाण करत आहेत. खरी मारहाण त्यांनी नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना केली पाहिजे अशी प्रतिक्रीया घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

Water Logging in Mumbai : नाल्यात कचरा टाकाल तर २०० रुपये दंड – BMC चा निर्णय

ADVERTISEMENT

दरम्यान दिलीप लांडेंनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. मी या मतदार संघाचा आमदार आहे. नालेसफाईची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ती लोकं इथे येत नाहीत. लोकांनी विश्वास ठेवून मला आमदार म्हणून निवडून दिलंय. नालेसफाईचं कंत्राट ठेकेदाराला देण्यात आलंय, पण त्याने आपलं काम केलं नाही म्हणून मला रस्त्यावर उतरुन गटार साफ करावं लागतंय. माझ्या मतदार संघातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जो त्रास माझ्या मतदारसंघातील नागरिकांना सहन करावा लागला तो त्रास कंत्राटदाराला झाला पाहिजे म्हणून मी हे काम केल्याचं आमदार दिलीप लांडेंनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT