महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजारांपेक्षा जास्त नवे Corona रुग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात १५ हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज १५ हजार ५१ रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज राज्यात ४८ कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची वाढ झपाट्याने होते आहे. महाराष्ट्रासाठी ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

ADVERTISEMENT

राज्यातील मृत्यूदर २.२७ टक्के इतका आहे. दिवसभरात राज्यात १० हजार ६७१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण २१ लाख ४४ हजार ७४३ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.७ टक्के एवढं झालं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७६ लाख ९ हजार २४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३ लाख २९ हजार ४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २३ हजार १२१ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला १ लाख ३० हजार ५४७ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.आज राज्यात १५ हजार ५१ नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रूग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या २३ लाख २९ हजार ४६४ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा Lockdown लागणार का? राजेश टोपे म्हणतात…

ADVERTISEMENT

आज नोंद झालेल्या ४८ मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासांपैकी आहेत. तर ७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे १४ मृत्यू वर्धा ९, ठाणे २, नाशिक १, औरंगाबाद १ आणि सिंधुदुर्ग १ असे आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

ADVERTISEMENT

राज्यातील महत्त्वाची शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई -१३ हजार ३०९

ठाणे -१२ हजार ६८०

पुणे – २६ हजार ४६८

नाशिक- ८ हजार ३५

जळगाव- ४ हजार ९५५

औरंगाबाद – ७ हजार ८९९

नांदेड – ३ हजार ६९

अमरावती – ३ हजार ९३०

अकोला ३ हजार १६७

नागपूर १८ हजार ११४

राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केला तर पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT