मुंबईत दिवसभरात 1794 नवे कोरोना रूग्ण, पुण्यात 1165 पॉझिटिव्ह रूग्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत दिवसभरात 1794 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 3580 जणांना कोरोना रूग्ण बरे झाले आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 78 हजार 269 रूग्णांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी एकूण 6 लाख 16 हजार 998 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज घडीला मुंबईत 45 हजार 534 सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबईत कोरोनामुळे आत्तापर्यंत एकूण 13 हजार 891 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 23 हजार 61 चाचण्या झाल्या आहेत. तर आत्तापर्यंत मुंबईत एकूण 57 लाख 33 हजार 431 चाचण्या झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

आज मृत्यू झालेल्या 74 रूग्णांपैकी 51 रूग्ण सहव्याधी असलेले आहेत. तर 46 रूग्ण पुरूष होते तर 28 रूग्ण महिला होत्या. 3 मृत्यू हे 40 वर्षांखालील होते. 27 मृत्यू हे 40 ते 60 वयोगटातील होते. तर 44 मृत्यू 60 वर्षे आणि त्यावरील वयाचे होते. मुंबईचा रिकव्हरी रेट 91 टक्के इतका झाला आहे. तर मुंबईचा डबलिंग रेट 163 दिवसांवर गेला आहे.

पुण्यात दिवसभरात 1165 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 51 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 11 हजार 499 चाचण्या करण्यात आल्या. तर पुण्यात 4 हजार 10 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज घडीला 30 हजार 836 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात आत्तापर्यंत 4 लाख 47 हजार 729 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली. आजपर्यंत 4 लाख 9 हजार 484 रूग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत पुण्यात एकूण 22 लाख 87 हजार 587 चाचण्या झाल्या आहेत. तर पुण्यात एकूण 7 हजार 409 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT