महाराष्ट्रात Corona चे ३१ हजारांपेक्षा जास्त रूग्ण, वाढत्या संख्येने चिंतेत भर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात ३१ हजार ८५५ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत नक्कीच भर पडली आहे. दिवसभरात १५ हजार ९८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख ६२ हजार ५९३ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८८.२१ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.९ टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

‘१ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार’

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८७ लाख २५ हजार ३०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ६४ हजार ८८१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ६८ हजार ९४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर १३ हजार ४९९ व्यक्ती संस्था्त्मक क्वारंटाईन आहेत.

हे वाचलं का?

आमिर खानच्या संपर्कात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही करावी लागणार कोरोना टेस्ट

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये १० सर्वाधिक कोरोना रूग्ण असलेले जिल्हे जाहीर केले. त्यातले ९ जिल्हे हे महाराष्ट्रातले आहेत. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला या नऊ जिल्ह्यांमध्ये कोरोना वेगाने हात पाय पसरतो आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

राज्यात आज घडीला २ लाख ४७ हजार २९९ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. आज राज्यात ३१ हजार ८५५ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे कोरोना रूग्णांची एकूण संख्या ही २५ लाखांच्या वर गेली आहे. आज नोंद झालेल्या ९५ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू ठाणे ७, नाशिक ३, औरंगाबाद २, पुणे १, गोंदिया १ आणि अकोला १ असे आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT