महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांपेक्षा जास्त नवे Corona रूग्ण, 44 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 154 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात आज दिवसभरात 44 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 524 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 62 लाख 99 हजार 760 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.5 टक्के इतकं झालं आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 57 लाख 2 हजार 628 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 91 हजार 179 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात सध्या 2 लाख 96 हजार 579 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1952 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 49 हजार 812 सक्रिय रूग्ण आहेत.

आज महाराष्ट्रात 4 हजार 154 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 91 हजार 179 इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

मुंबई- 4732

ADVERTISEMENT

ठाणे-7832

ADVERTISEMENT

रत्नागिरी-1169

पुणे-13213

सातारा-5539

सांगली-1231

कोल्हापूर-1275

सोलापूर-2902

नाशिक-1035

अहमदनगर-6282

महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यांमधली सक्रिय रूग्णांची संख्या लक्षात घेतली तर पुण्यात सर्वाधिक म्हणजेच 13 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आहेत. त्यानंतर ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रूग्ण आहेत.

कोरोनाची लस घेतल्यानंतर मृत्यू ओढवण्याचा धोका किती?

कोरोनाची लस घेतल्यानंतर मृत्यू ओढवण्याचा धोका किती? या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारने गुरूवारी दिलं. ज्यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला आहे. त्यांचा मृत्यू होण्याचा धोका ९६.६ टक्क्यांनी कमी होतो, तर दोन्ही डोस घेतलेल्यांचा ९७.५ टक्के कमी होतो, असं केंद्रानं म्हटलं आहे.

कोरोना लसीमुळे कोरोना मृत्यूबद्दल मिळणाऱ्या संरक्षणाबद्दल केंद्र सरकारने गुरुवारी माहिती दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान केंद्राने माहिती गोळा केली होती. या माहितीवर करण्यात आलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे (ICMR) प्रमुख बलराम भार्गव यांनी ही माहिती प्रसिद्ध केली.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर इशारा

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट संपलेली नसल्याचं म्हटलं आहे. देशात आणि विविध राज्यात सण-उत्सवांना सुरूवात होणार असल्यानं केंद्रीय आरोग्य सचिवांनी काळजी घेण्याचा इशारा दिला. बेसावध न राहता लोकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन भूषण यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT