सलग दोन दिवस मुंबईतील Corona रूग्णवाढ टेन्शन वाढवणारी!
मुंबईत सलग दोन दिवस होणारी Corona रूग्ण वाढ टेन्शन वाढवणारी ठरते आहे. मुंबईत बुधवारी 415 नवे रूग्ण आढळले आहेत. तर गुरूवारी दिवसभरात ही रूग्णसंख्या 441 नवे कोरोना रूग्ण वाढले आहेत. मागील 43 दिवसात पहिल्यांदाच असे दोन दिवस आहेत ज्या दिवसांमध्ये मुंबईत 400 हून जास्त रूग्ण आढळले आहेत. मुंबईत दिवसभरात 205 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. […]
ADVERTISEMENT
मुंबईत सलग दोन दिवस होणारी Corona रूग्ण वाढ टेन्शन वाढवणारी ठरते आहे. मुंबईत बुधवारी 415 नवे रूग्ण आढळले आहेत. तर गुरूवारी दिवसभरात ही रूग्णसंख्या 441 नवे कोरोना रूग्ण वाढले आहेत. मागील 43 दिवसात पहिल्यांदाच असे दोन दिवस आहेत ज्या दिवसांमध्ये मुंबईत 400 हून जास्त रूग्ण आढळले आहेत. मुंबईत दिवसभरात 205 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तरीही रूग्णसंख्या दोन दिवसांमध्ये वाढल्याने मुंबईकरांचं टेन्शन वाढलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत आज दिवसभरात तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचंही वय 60 वर्षांवरील आहे. मुंबईत आत्तापर्यंत कोरोनामुळे 15 हजार 984 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईत 400 हून अधिक रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मुंबईत दिवसभरात 205 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 23 हजार 155 रूग्ण बरे झाले आहेत.
1 सप्टेंबरला काय होती परिस्थिती?
हे वाचलं का?
मुंबईत 1 तारखेला 416 नवे रूग्ण आढळले. तर चार मृत्यूंची नोंद झाली. या चारपैकी एक रूग्ण महिला होती. तर एक रूग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचा होता.
राज्यात काय आहे आजची परिस्थिती?
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 342 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात दिवसभरात 55 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यात दिवसभरात 4 हजार 755 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 81 हजार 985 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत.
ADVERTISEMENT
62 लाख 81 हजारांहून अधिक रूग्ण आत्तापर्यंत बरे झाल्याने राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.4 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 43 लाख 27 हजार 469 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण 64 लाख 73 हजार 674 नमुने आजवर पॉझिटिव्ह आले आहेत.
महाराष्ट्रात सध्या 2 लाख 87 हजार 385 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1971 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 50 हजार 607 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 4 हजार 342 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 73 हजार 674 इतकी झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT