जुन्नर : थंडी आणि अवकाळी पावसामुळे शेकडो मेंढ्या-बकऱ्या दगावल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि थंडीच्या कडाक्यामुळे शेकडो शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत. ज्यामुळे या भागाताली पशुपालक आणि मेंढपाळ धास्तावले आहेत. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुन्नरमध्ये ४४३ शेळ्या-मेंढ्या मृत्यूमुखी पावल्या आहेत.

ADVERTISEMENT

जुन्नर तालुक्यातील राजुरी या ठिकाणी अवकाळी पावसाने व थंडीने पाच मेंढपाळांच्या जवळपास ५० मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. गोळेगाव परिसरात १५ पेक्षा जास्त शेळ्या मृत्यू पडल्यात तर आंबेगाव तालुक्यात विविध ठिकाणी सातपेक्षा जास्त मेंढपाळा च्या १५० हून अधिक जास्त मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

आंबेगाव तालुक्यातील धोंडमाळ शिवारामध्ये पावसामुळे व गारव्यामुळे ३० ते ३५ मेंढरं मृत्युमुखी पडली आहेत. शिंगवे-पारगाव येथे २०-२५ तर खडकी पिंपळगाव इथे ४०-४५ मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. काठापूर बुद्रुक येथे ३२ मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत.

हे वाचलं का?

वळती येथे रात्री झालेल्या पावसामुळे खंडू कोळेकर यांच्या १२ , सिद्धा माने यांच्या ६ , राजू माने यांच्या ५ मेंढ्या दगावल्या आहेत. पांडुरंग येसू गुलदगड यांचे २५ बकरे पावसात भिजून दगावली आहेत

महाबळेश्वरला अवकाळी पावसाचा फटका : स्ट्रॉबेरीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT