ह्रदयद्रावक! लेकीला वाचण्यासाठी आईवडिलांनी केले शर्थीचे प्रयत्न, पण चिमुकलीसह आईचाही मृत्यू
अमरावती जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कॅनॉलमध्ये कोसळलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी आईवडिलांनी प्राणांची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काळाच्या मनात काही वेगळंच होतं. दोन वर्षाच्या चिमुकलीसह आईचाही बुडून मृत्यू झाला. वडिलांना वाचवण्यात यश आलं. मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील घुंगशी बॅरेजवरुन येत असताना चिमुकली आराध्या (वय २ वर्ष) ही पाय घसरुन […]
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कॅनॉलमध्ये कोसळलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी आईवडिलांनी प्राणांची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काळाच्या मनात काही वेगळंच होतं. दोन वर्षाच्या चिमुकलीसह आईचाही बुडून मृत्यू झाला. वडिलांना वाचवण्यात यश आलं.
ADVERTISEMENT
मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील घुंगशी बॅरेजवरुन येत असताना चिमुकली आराध्या (वय २ वर्ष) ही पाय घसरुन बॅरेजमधील पाण्यात कोसळली. तिला वाचविण्यासाठी आई-वडिलांनी पाठोपाठ पाण्यात उडी घेतली. यात चिमुकलीसह आईचा मृत्यू झाला उपस्थित चौकीदाराच्या प्रसंगावधानामुळे वडिलाचे प्राण वाचले. ही घटना रविवारी घडली.
पारद येथील रहिवासी गौरव सुरेश तायडे (वय ३२ वर्ष ) हे पत्नी प्रिया गौरव तायडे (२८) व मुलगी आराध्या (२) यांच्यासह नदीपलीकडे असलेल्या दर्यापूर तालुक्यातील धामोडी इथे मावशीच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून रविवारी (६ फेब्रुवारी) परत येत असताना बॅरेजजवळ आल्यानंतर गेट बंद असल्याने चौकीदार संजय भाऊराव गवई यांना चावी मागीतली. याच दरम्यान मुलगी गेटच्या दिशेनं गेली आणि पाय घसरून ती पाण्यात पडली.
हे वाचलं का?
तिला वाचवण्यासाठी आई प्रिया व वडील गौरव यांनी पाण्यात उडी घेतली. अचानक घडलेल्या घटनेनंतर चौकीदार संजय गवई यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरात असलेले युवक धावुन आले. त्यांनी तातडीने पाण्यात दोरी फेकली. मात्र, तोपर्यंत मायलेकीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता. वडील गौरव यांनी दोर पकडल्यानं त्यांचे प्राण वाचले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दर्यापूर पोलीस व जिल्हा शोध बचाव पथक जिल्हाधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकाने मायलेकींचा शोध घेतला. मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी दर्यापूर येथे पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस करीत आहे.
ADVERTISEMENT
मृतक प्रिया गौरव तायडे व आराध्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेवरून प्रिया यांच्या वडिलांनी शंका उपस्थित केली आहे. वडील विठ्ठल गोविंदराव फुंडकर यांनी आक्षेप घेत दोघींचा मृत्यू नेमका पाय घसरून झाला की, त्यांना पाण्यात ढकलून देण्यात आलं, याची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे.
ADVERTISEMENT
मृतक प्रिया गौरव तायडे व आराध्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेवरून प्रिया यांच्या वडिलांनी शंका उपस्थित केली आहे. वडील विठ्ठल गोविंदराव फुंडकर यांनी आक्षेप घेत दोघींचा मृत्यू नेमका पाय घसरून झाला की, त्यांना पाण्यात ढकलून देण्यात आलं, याची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT