आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेप
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेप तसंच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. ए. एम. देशमुख यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना वाठोडा पोलिसांच्या हद्दीतील आहे. आरोपी मुलगा हा ३२ वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते. परंतु, त्याच्या विकृत […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम मुलाला नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेप तसंच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. ए. एम. देशमुख यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही घटना वाठोडा पोलिसांच्या हद्दीतील आहे.
हे वाचलं का?
आरोपी मुलगा हा ३२ वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे. त्याचे लग्न झाले होते. परंतु, त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीला सासरी राहणे कठीण झाले. परिणामी, तिने या घटनेच्या तीन वर्षापूर्वी घटस्फोट घेतला. पीडित आई धुणीभांडी करून जीवन जगते. ती आरोपीचीही काळजी घेत होती. असे असताना २१ जून २०२१ रोजी मध्यरात्री आरोपीने ताळतंत्र सोडून आईवरच बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई आणि इतर साक्षीदारांचा जबाब आणि डीएनए अहवाल यावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
व्यवसायाने मजुरी करणारा हा मुलगा विकृत प्रवृत्तीचा आहे. त्याच्या याच विकृतीमुळे त्याच्या पत्नीनेही त्याला तीन वर्षांपूर्वी घटस्फोट दिला आहे. या मुलाची घरातली परिस्थिती हलाखीची आहे. त्याची आई धुणी-भांडी करून चरितार्थ चालवते. ती मुलाचीही काळजी घेत होती. मात्र 21 जून 2021 ला या मुलाने त्याच्या आईवरच बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित आईने पोलिसात तक्रार केली. ज्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नागपूरमधल्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT