आर्यन खानची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी नितेश राणेंच्या जामिन अर्जासाठी मैदानात
सिंधुदुर्गात शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे नितेश राणेंच्या बाजूने माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत. रोहतगी यांनी याआधी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला जामीन मिळवून दिला होता. देशाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही.रामण्णा यांनी २७ जानेवारीला या याचिकेवर सुनावणी […]
ADVERTISEMENT
सिंधुदुर्गात शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे नितेश राणेंच्या बाजूने माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत. रोहतगी यांनी याआधी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला जामीन मिळवून दिला होता.
ADVERTISEMENT
देशाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही.रामण्णा यांनी २७ जानेवारीला या याचिकेवर सुनावणी होईल असं सांगितलं आहे. राणेंचा अर्ज दाखल करताना मुकुल रोहतगी यांनी राजकीय सूडाच्या भावनेपोटी राणेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टाने १७ जानेवारीला नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता.
हायकोर्टाने २७ जानेवारीपर्यंत नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्याची मुदत दिली होती. तोपर्यंत नितेश राणेंना अटक न करण्याचा आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिला होता. ही मुदत संपायला अवघे दोन दिवस बाकी असताना राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हे वाचलं का?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासूनच गायब झालेले नितेश राणे २४ जानेवारीला कणकवली पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले. कणकवली पोलीस ठाण्यात सुमारे पाऊण तास नितेश राणेंची चौकशी करण्यात आली. त्यामुळे २७ जानेवारीला मुकुल रोहतगी नितेश राणेंची बाजू सर्वोच्च न्यायालयात कशी मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आर्यन खान प्रकरणात महिनाभर अपयश आल्यानंतर मुकुल रोहतगी यांनी शाहरुखच्या मुलाची बाजू मांडत त्याला जामिन मिळवून दिला होता. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी मनीष दळवी यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT