Lockdown मध्ये विनामास्क क्रिकेट खेळणं पडलं महागात, कोर्टाने तरुणाला जामिन नाकारला
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. तरीही काही भागांमध्ये जनतेकडून नियम सर्रास धाब्यावर बसवले जात आहेत. मुंबईत लॉकडाउन काळात आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईतल्या सत्र न्यायालयाने २० वर्षीय आरोपीची जामिनाची याचिका फेटाळून लावली आहे. जळगाव : लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, वधू-वर पित्यांना […]
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची घोषणा केली आहे. तरीही काही भागांमध्ये जनतेकडून नियम सर्रास धाब्यावर बसवले जात आहेत. मुंबईत लॉकडाउन काळात आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईतल्या सत्र न्यायालयाने २० वर्षीय आरोपीची जामिनाची याचिका फेटाळून लावली आहे.
ADVERTISEMENT
जळगाव : लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, वधू-वर पित्यांना ५० हजारांचा दंड
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २० वर्षीय कुरेशी नामक एका तरुणाला इतर सहा मुलांसोबत रस्त्यावर क्रिकेट खेळताना पकडलं होतं. हे सर्व तरुण रस्त्यावर विनामास्क क्रिकेट खेळत होते. पोलीस राऊंडअप साठी आले असताना हे सहा तरुण घटनास्थळावरुन फरार झाले…परंतू आपले मोबाईल घेऊन जाण्यास ते विसरले. यानंतर मोबाईल घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना, कुरेशी सोबत असलेल्या एका तरुणाने पोलिसांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली. ज्यानंतर पोलिसांनी कुरेशी आणि त्याच्यासोबत असलेल्या ६ तरुणांवर पोलीस कारवाईत अडथळा आणि जमावबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
हे वाचलं का?
निर्मनुष्य रस्ते…घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला Lockdown मुळे ब्रेक
कुरेशीलाा अटक करुन न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांनी कुरेशीला जामिन नाकारल्यानंतर त्याने सत्र न्यायालयात धाव घेतली. Additional Sessions Judge अभिजीत नांदगावकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत कुरेशीने आपल्याविरोधात चुकीची कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं. परंतू सुनावणीदरम्यान कुरेशीच्या वकीलांनी मांडलेला युक्तीवाद न्यायालयाला पटला नाही. “जरी आरोपीला कठोर नियम आणि अटींवर जामिनावर सोडलं तरीही त्याने सध्याच्या खडतर काळात प्रशासनाने आखून दिलेले नियम पाळले नाही ही बाब विसरता येणार नाही. अशा परिस्थितीत रस्त्यावर विनामास्क क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आणि कायद्याला धरुन आहे. आरोपीचं वय २० वर्ष असलं तरीही त्याला सध्या शहरात आणि देशात कोरोनामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याची कल्पना असेल”, असं मत व्यक्त करत सत्र न्यायालयाने आरोपीचा जामिन फेटाळला आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान या घटनेत पोलिसांकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करणारा तरुण हा अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याच्यावर ज्युविनाइल अॅक्टनुसार कारवाई करुन त्याचा ताबा त्याच्या वडीलांकडे सोपवण्यात आला आहे. याव्यतिरीक्त २० वर्षीय कुरेशीसोबत असणारे इतर तरुण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT