Matrimonial Site वरुन महिलांना लग्नाचं आमिष, मुंबईत भामट्याला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मॅट्रीमोनिअल साईटवरुन महिलांना लग्नाचं आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम लुबाडणाऱ्या चोरट्याला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सतीश गरुड असं या आरोपीचं नाव आहे.

ADVERTISEMENT

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सतीश गरुडने मॅट्रीमोनिअल साईटवर आपली ओळख एक उद्योगपती अशी करुन दिली. आपली आई लंडनला राहत असून असं आरोपीने पीडित महिलेला सांगितलं. यानंतर आरोपीने महिलेला मला तुझ्याशी लग्न करायचं असं सांगितलं.

परंतू महिलेने आरोपीला मी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी असून मी तुमच्याएवढी श्रीमंत नसल्याचं सांगितलं. परंतू आरोपी तरीही तिच्यासोबत लग्न करायच्या जिद्दीवर अडून राहिला. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने हळुहळु तिच्याकडून पैसे लुबाडण्यास सुरुवात केली.

हे वाचलं का?

पंढरपूर : मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एकदा आरोपी सतीश गरुडने पीडित महिलेला माझ्या घरी आयकर विभागाची धाड पडणार असून मला पैसे जमवायचे असल्याचं सांगितलं. परंतू आपल्याकडे एवढे पैसे नसल्याचं सांगितल्यानंतर आरोपीने महिलेला कर्ज घेण्यासाठी सांगितलं. अशा पद्धतीने आरोपीने या महिलेकडून १८ ते २० लाख रुपये उकळले. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

यानंतर सायबर पोलीसांच्या DCP रश्मी करंदीकर यांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली. या चौकशीदरम्यान आरोपीने १० महिलांना अशाच पद्घतीने फसवल्याचं समोर आलं. इतकच नव्हे तर आरोपी सतीश गरुडने क्रिमीनल सायकोलॉजी आणि कायद्याचा अभ्यास केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपीने आतापर्यंत घटस्फोटीत आणि ३० वर्षापेक्षा जास्त महिलांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेऊन फरार झाल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT