मांजरीचं शेपूट कापल्याप्रकरणी थेट मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मांजरीवरचं अनेकांचं प्रेम आपल्याला ठाऊक आहेच. अनेक घरांमध्ये मांजर ही पाळली जाते, उंदीर होऊ नयेत हे कारण असो किंवा अगदी हौस हे कारण असो. जसे कुत्रे पाळले जातात तितक्याच हौसेने मांजरही पाळण्यात येते. एका भटक्या मांजरीची शेपटी कुणीतरी कापली असल्याची बाब अजय रमेश शहा यांना लक्षात आली. अजय शहा यांच्या घरी ही मांजर रोज येत होती, ते तिला खायला देत असत. रविवारी ही मांजर जेव्हा आली तेव्हा तिची शेपटी कुणीतरी कापल्याचं अजय शहा यांच्या लक्षात आलं. त्यांनी या प्रकरणी आता मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ADVERTISEMENT

‘आम्ही कधी असा कुत्रा-मांजराचा खेळ खेळला नाही,’ खडसेंची फडणवीसांवर जोरदार टीका

काय म्हटलं आहे तक्रारीत?

हे वाचलं का?

मी माझ्या मालाड येथील घरात गेल्या चार वर्षांपासून राहतो. तिथे पांढऱ्या आणि ब्राऊन रंगाची साधारण 2 वर्षे वय असलेली मांजर कधी कधी आमच्या घरी येते. या मांजरीला घरी आल्यानंतर आम्ही खायला देत असतो. 29 एप्रिलला ही मांजर घरी आली होती तेव्हा तिचा आम्ही मोबाईलमध्ये फोटो काढला होता. तेव्हा ती मांजर व्यवस्थित होती तंदुरूस्त दिसत होती. मात्र 2 मे रोजी जेव्हा ती घरी आली तेव्हा तिची पूर्ण शेपटी कुणीतरी कापून तिला इजा केली आहे हे लक्षात आलं.

कुठल्यातरी धारदार वस्तूने या मांजरीची शेपटी कापण्यात आल्याचं कळलं. त्यामुळे मी या मांजरीला उचललं आणि अहिंसा वेटरनरी क्लिनिक, एव्हरशाईन नगर, मालाड या ठिकाणी घेऊन गेलो. 2 मे रोजी रविवार होता. रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे या मांजरीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. तिथे मला मांजरीला सोमवारी परत दवाखान्यात घेऊन या असेही सांगण्यात आले. कोणीतरी अज्ञात इसमाने मांजरीची शेपटी अत्यंत धारदार वस्तूने कापल्याचं कळतं आहे त्यामुळे मी पोलिसात ही तक्रार नोंदवत आहे. साधारण २ वर्षे वयाच्या मांजरीसोबत झालेला हा प्रकार अतिशय संतापजनक आहे त्यामुळे अज्ञात इसमाला शोधून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करतो आहे. असं शहा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘या’ गावात कोरोनापासून संरक्षणासाठी पाळीव प्राण्यांनीही लावला जातो आहे मास्क

ADVERTISEMENT

भारतीय दंडसंहितेच्या अॅनिमल्स अॅक्ट अन्वये या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. पोलीस या भागातलं सीसीटीव्ही फुटेजही तपासून हे कृत्य कुणी केलं आहे ते तपासत आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT