Rain Alert : पावसाचा जोर कायम! कोकणाला ‘ऑरेंज अलर्ट’, मुंबईसह महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’!
गेल्या आठवड्यापासून राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. विदर्भासह मराठवाडा, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र व मुंबई-ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस (७ सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’, तर मुंबई-ठाणे-पुण्यासह राज्यातील जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून सप्टेंबर महिन्यातील […]
ADVERTISEMENT
गेल्या आठवड्यापासून राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. विदर्भासह मराठवाडा, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र व मुंबई-ठाण्यासह कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस (७ सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’, तर मुंबई-ठाणे-पुण्यासह राज्यातील जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हवामान विभागाकडून सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस राहिलं अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. सरासरीपेक्षा चांगला पाऊस बरसणार असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
हे वाचलं का?
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रात पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या काळात राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
४ सप्टेंबर रोजी ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
ADVERTISEMENT
अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, जालना, बीड, औरंगाबाद, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली.
ADVERTISEMENT
५ सप्टेंबरसाठी ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
3 Sept, IMD ने आज दिलेल्या इशा-या प्रमाणे,राज्यात येत्या 5 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटा सहीत पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मुसळधार. कोकणात ६,७ Sept ला काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पण.@RMC_Mumbai @RMC_Nagpur pic.twitter.com/ikksIA1dVw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2021
६ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
जळगाव, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सप्टेंबर मध्ये संपूर्ण देशात चांगल्या पावसाची शक्यता pic.twitter.com/1MW8ivCKc5
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 1, 2021
७ सप्टेंबर रोजी कसा असेल पाऊस…?
७ सप्टेंबर रोजीही राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT