Mumbai Crime : दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी करणाऱ्या टोळीला मालाड पोलिसांनी केली अटक
– शिवशंकर तिवारी, मुंबई प्रतिनीधी दिवसाढवळ्यात घरात शिरुन सामान चोरी करणाऱ्या एका टोळीला मुंबईतील मालाड पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतले पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या टोळीने मालाडमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात शिरुन टीव्ही, लॅपटॉप आणि अन्य मौल्यवान वस्तू असा ४० लाखांचा मुद्देमाल लुटला होता. आपल्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी ज्येष्ठ […]
ADVERTISEMENT
– शिवशंकर तिवारी, मुंबई प्रतिनीधी
ADVERTISEMENT
दिवसाढवळ्यात घरात शिरुन सामान चोरी करणाऱ्या एका टोळीला मुंबईतील मालाड पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतले पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच या टोळीने मालाडमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात शिरुन टीव्ही, लॅपटॉप आणि अन्य मौल्यवान वस्तू असा ४० लाखांचा मुद्देमाल लुटला होता. आपल्या वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक घराबाहेर गेलेला असताना चोरट्यांनी हा डल्ला मारला होता.
या घटनेविरुद्ध मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आपल्या खबऱ्यांना कामाला लावत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना या टोळीच्या मागे लावत पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. या पाचही आरोपींवर मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे २५ गुन्हे दाखल आहेत.
हे वाचलं का?
पंढरपूर : अलिशान गाडीतून चंदन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
ही टोळी टॅक्सीतून एकत्र फिरत चोरीचा प्लान आखायची. एखाद्या भागात फिरत असताना तिथल्या लोकांवर नजर ठेवायची, परिसराची रेकी करायची हा त्यांचा हातखंडा होता. एखादं सावज हातात आल्यानंतर ते संधी साधून घरात शिरुन चोरी करायचे. या सर्व आरोपींना अखेरीस जाळ्यात अडकवण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ADVERTISEMENT
पिस्तुल आणि गुप्तीच्या धाकाने विवस्त्र करून अश्लील कृत्य करायला लावायची टोळी, चौघांना अटक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT