मुंबईत दिवसभरात 2554 रूग्ण पॉझिटिव्ह, तर 5240 रूग्ण कोरोनामुक्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत दिवसभरात 2554 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 5240 रूग्णा कोरोनातून बरे झाले आहेत. आज दिवसभरात 62 जणांचा कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात मुंबईत 29 हजार 76 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज घडीला मुंबईत 51 हजार 380 सक्रिय रूग्ण आहेत.

ADVERTISEMENT

Lockdown: कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय: राहुल गांधी

मुंबईत आत्तापर्यंत एकूण 6 लाख 61 हजार 420 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आत्तापर्यंत एकूण 5 लाख 94 हजार 859 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 13 हजार 470 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 55 लाख 42 हजार 859 चाचण्या झाल्या आहेत.

हे वाचलं का?

दिवसभरात 62 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 38 रूग्ण हे सहव्याधी असलेले होते. तर 62 पैकी 39 पुरुष आणि 23 महिला होत्या. आज झालेल्या मृत्यूंपैकी पाच मृत्यू हे 40 वर्षांखालील रूग्णांचे आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 90 टक्के झाला आहे. तर 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत 0.58 टक्के इतका ग्रोथ रेट आहे. मुंबईचा डबलिंग रेट हा 116 दिवसांवर पोहचला आहे.

Oxygen च्या बाबतीत महाराष्ट्र लवकरच स्वयंपूर्ण होणार-राजेश टोपे

ADVERTISEMENT

ऑक्सिजनच्या बाबतीत आता महाराष्ट्र लवकरच स्वयंपूर्ण होऊ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ऑक्सिजन निर्मिती, लसीकरण या सगळ्याविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबईत लसींचा तुटवडा आहे, राज्यातही लसींचा तुटवडा आहे त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

तसंच लॉकडाऊनचा काही प्रमाणात फायदा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईसह राज्यात काही प्रमाणात केसेस कमी झाल्या आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी झाली आहेत मात्र उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत ते नियंत्रणात आणणं हे आता आव्हान आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT