मुंबईतील शाळा गजबजणार! आजपासून भरणार 1ली ते 7वीचे वर्ग; महापालिकेेचं पालकांना आवाहन
दिवाळीनंतर राज्य सरकारने राज्यातील 1ली ते 7वी वर्गाच्याही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी महापालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. मुंबई महापालिकेनं 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येतील असं सांगितलं होतं. त्यानुसार आजपासून (15 डिसेंबर) मुंबईतील 1ली ते 7वीच्या शाळा सुरू होत […]
ADVERTISEMENT
दिवाळीनंतर राज्य सरकारने राज्यातील 1ली ते 7वी वर्गाच्याही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी महापालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. मुंबई महापालिकेनं 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येतील असं सांगितलं होतं. त्यानुसार आजपासून (15 डिसेंबर) मुंबईतील 1ली ते 7वीच्या शाळा सुरू होत आहेत.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर मुंबई महापालिकेनं 1ली ते 7वीचे वर्ग शाळेत भरवण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. खबरदारीची बाब म्हणून महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्णही आढळून आले. त्यामुळे शाळा सुरू होतील की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
अखेर महापालिका प्रशासनाने 1ली ते 7वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनातील शंका दूर केली आहे. निर्णयाप्रमाणे आजपासून 1ली ते 7वीच्या शाळा सुरू होत आहेत. याबद्दल महापालिकेने ट्विटर हॅण्डलवरूनही माहिती दिली आहे.
हे वाचलं का?
’15 डिसेंबर 2021 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या, इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी कोविड विषयक सूचनांचे पालन करावे,” असं आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलं आहे.
दिनांक १५ डिसेंबर, २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या, इयत्ता पहिली ते सातवी च्या शाळा सुरू होत आहेत.
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी कोविड विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन! https://t.co/jajgSW9dBf pic.twitter.com/ewfjprtdfm
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 14, 2021
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या सूचना…
ADVERTISEMENT
– जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.
ADVERTISEMENT
– वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.
– वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.
– सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.– कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
– खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.
– खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं.
– विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क आणि दोन मीटरचं अंतर असावं.
– जवळचे संबंध येणारे खो-खो, कबड्डी असे खेळ टाळावेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT