सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मुंबईतल्या S L रहेजा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. आज अखेर कोरोनामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांचे विविध अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.

ADVERTISEMENT

कोरोना संकट असतानाही वर्षभर केंद्र सरकारकडून ऑक्सिजनची निर्यात, ‘ही’ माहिती आली समोर

श्रवण राठोड यांना मधुमेहही होता. तसंच हृदयविकाराचाही त्रास होत होता. त्यांना कोव्हिडची बाधा झाली त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. ते 66 वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रूग्णालयात दाखल कऱरण्यात आलं होतं. श्रवण यांचा मुलगा संजीव यालाही कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

त्यांच्या मागे त्यांची दोन मुलं संजीव आणि दर्शन आहेत. नदीम श्रवण या जोडीने 90 च्या दशकात एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. आशिकी, दिल है के मानता नहीं, साजन, परदेस, सडक, दिल का क्या कसूर? या आणि अशा अनेक सिनेमांना नदीम श्रवण जोडीने संगीत दिलं आहे. 2000 मध्ये नदीमने देश सोडला आणि तो परदेशात स्थायिक झाला. 2009 मध्ये आलेला डू नॉट डिस्टर्ब हा या दोघांनी संगीत दिलेला शेवटचा सिनेमा ठरला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT