केंद्र सरकारने वेळप्रसंगी कर्ज काढावं पण सर्वांचं लसीकरण करावं; नाना पटोले यांचं वक्तव्य
कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणं अपेक्षित आहे. परंतु रेमडेसीवर, ऑक्सिजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जातंय हे अत्यंत दुर्देवी आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आता आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. परंचु राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या भयानक स्थितीचा महाराष्ट्र सामना करत असताना केंद्र सरकारने राज्याला योग्य ती मदत करणं अपेक्षित आहे. परंतु रेमडेसीवर, ऑक्सिजनअभावी जीव जात असतानाही त्यात राजकारण केले जातंय हे अत्यंत दुर्देवी आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आता आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. परंचु राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये, वेळप्रसंगी कर्ज काढावं आणि सर्वांचं लसीकरण करावं, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलीये.
ADVERTISEMENT
पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनाविरोधातील लढ्यासंदर्भात काही सकारात्मक सूचना केल्या होत्या. माजी पंतप्रधानांनी केलेल्या सुचनांचा आदर करणं अपेक्षित असताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काँग्रेसशासित राज्यातच कोरोनाची वाईट परिस्थिती आहे त्यांना सल्ला द्या असं म्हटलं. काँग्रेसने या महामारीत कधीच राजकारण केलं नाही आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. पण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याआधी गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपाशासित राज्यातील परिस्थिती नीट पहावी, असंही पटोले म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला
हे वाचलं का?
“मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोना परिस्थितीत थोडासा सुधार झाला त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना मुक्तीचं श्रेय घेण्यासाठी आता कोरोनाची भिती राहिली नाही, असं प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला कोरोनाच्या खाईत ढकलण्याचे पाप केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवडणुका असलेल्या राज्यात कोरोना नाही असं विधान केलं होतंनिवडणुकीमुळे कोरोना नष्ट होत असेल तर मग केंद्रातील सरकारही बरखास्त करून सर्व देशात निवडणुका लावाव्यात कोरोना नष्ट होईल,” असा टोला पटोले यांनी लगावला.
राहुल गांधी यांच्यावर टीका करणा-या देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना पटोले म्हणाले की, “कोणाला फेकू म्हटले जाते, कुणाला तडीपार म्हटले जाते, कुणाला टरबुजा म्हटले जाते, कुणाला चंपा म्हटले जाते. पण कोणाच्या नावाचा अपभ्रंश करून उल्लेख करण्याची काँग्रेसची आणि महाराष्ट्राची संस्कृती नाही.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT