राणेंच्या अटकेआधी काय घडलं?; मुंबई उच्च न्यायालय, रत्नागिरी न्यायालय काय म्हणालं?

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्र्यांच्या कामावर टीका करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त विधान केलं. या विधानाचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून, पोलिसांकडून ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र त्यांना दिलासा मिळू शकला नाही.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव की अमृत महोत्सव हेही माहिती नाही. मी तिथे असतो, तर कानाखाली चढवली असती’, असं विधान राणे यांनी सोमवारी महाड येथील पत्रकार परिषदेत केलं होतं. या विधानानंतर शिवसेना-राणे यांच्यातील संघर्ष उफाळून आला.

दरम्यान, या विधानावरून राणेंविरुद्ध नाशिकसह राज्यात चार ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी राणेंना अटक केली आहे. नारायण राणे यांनी अटक टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

हे वाचलं का?

नाशिक पोलिसांचं पथक राणे यांना अटक करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे दाखल झाले. अटक टाळण्यासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.

रत्नागिरी न्यायालयात काय घडलं?

ADVERTISEMENT

रत्नागिरी येथील जिल्हा सत्र न्यायालयात याचिकेवर तातडीने सुनावणी झाली. जिल्हा न्यायाधीश ला.द. बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत याचिका फेटाळून लावली. खटला नाशिकमधील आहे, मग रत्नागिरीत जामिनासाठी अर्ज का असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

ADVERTISEMENT

मुंबई उच्च न्यायालय काय म्हणाले?

रत्नागिरी उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. वकील अनिकेत निकम यांच्यामार्फत राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली. पोलिसांकडून कलम ४१ अ चं पालन केलं गेलं नसल्याचं राणेंच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. तसंच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली.

न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंठपीठाने प्रक्रियेनुसार याचिका दाखल करण्यास सांगितलं. त्यावर आपण याचिका स्कॅन केलेली असून, यावर सुनावणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. पोलीस एका केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी हजर झाले आहेत, असं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं.

त्यावर सगळ्यांनी प्रक्रियेचं पालन करायला हवं. आम्ही नोंदणी प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेणं गरजेचं वाटतं नाही, असं सांगत न्यायालयाने याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पोलिसांनी संगमेश्वर येथे नारायण राणे यांना ताब्यात घेतलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT