नवाब मलिकांना समीर वानखेडेंविरोधात आरोप करणं भोवलं?
मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक केली. पण मलिक हे काही आता अटकेचा विषय किंवा नॅशनल हेडलाईन बनलेले नाहीयेत. 2021 मधली आर्यन खानची केस तुम्हाला लक्षात असेलच, त्यावेळेला समीर वानखेडे आणि NCB ला शिंगावर घेणारं कुणी असेल तर ते नवाब मलिकच. नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर असं बोललं जातंय की NCB, समीर वानखेडेंना टार्गेट […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक केली. पण मलिक हे काही आता अटकेचा विषय किंवा नॅशनल हेडलाईन बनलेले नाहीयेत. 2021 मधली आर्यन खानची केस तुम्हाला लक्षात असेलच, त्यावेळेला समीर वानखेडे आणि NCB ला शिंगावर घेणारं कुणी असेल तर ते नवाब मलिकच. नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर असं बोललं जातंय की NCB, समीर वानखेडेंना टार्गेट करणं मलिकांना महागात पडलंय का?
2021 मध्ये असं नेमकं काय घडलेलं? मलिकांनी NCB आणि समीर वानखेडेंवर नेमके काय आरोप केलेले? जाणून घेऊयात सविस्तर.
2 ऑक्टोबर- कॉर्डिलिया क्रूझवर NCB ने रेड टाकली, ज्यात पहिले शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं, आणि नंतर आर्यन NCB च्या कस्टडीत गेला, काही दिवसांनंतर आर्थर रोड जेलमध्येही गेला, जिथे तो 20 दिवस होता.
आधी फक्त बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शनपुरता मर्यादित असलेल्या या प्रकरणात उडी मारली ती मंत्री नवाब मलिकांनी. आर्यनला रेड झाल्याच्या 4 दिवसांतच म्हणजे 6 ऑक्टोबरला नवाब मलिकांनी एक पत्रकार परिषद घेतली, तेव्हापासून ही रेड कशी एक फर्जिवाडा होती ते समीर वानखेडे हा अधिकारीच कसा फ्रॉड आहे इथपर्यंत मलिकांनी शेकडो आरोप केले, हे आरोप काय होते ते पण सजमून घ्या.










