Nawab Malik: नवाब मलिकांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’, फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप
मुंबई: ‘मी फडणवीसांबाबतच्या अंडरवर्ल्ड संबंधांबाबत हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहे.’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी (9 नोव्हेंबर) म्हटलं होतं. ज्यानुसार आज (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि त्याचद्वारे ते लोकांकडे खंडणी वसूल करायचे असा आरोप नवाब मलिकांनी […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘मी फडणवीसांबाबतच्या अंडरवर्ल्ड संबंधांबाबत हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहे.’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी (9 नोव्हेंबर) म्हटलं होतं. ज्यानुसार आज (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते आणि त्याचद्वारे ते लोकांकडे खंडणी वसूल करायचे असा आरोप नवाब मलिकांनी केले आहेत. दरम्यान, याप्रकरणाचे सगळे पुरावे आपण गृह खात्याला देणार असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आशीर्वादाने’च महाराष्ट्रात वसूली आणि बनावट नोटांचं रॅकेट खुलेपणाने सुरु होतं. समीर वानखेडे या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी फडणवीसांकडून संपूर्ण प्रकरणाचं लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.’ असा अनेक आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले आहेत.
पाहा नवाब मलिक यांनी नेमके काय-काय आरोप केले.
‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना, गुन्हेगारांना शासकीय आयोग, बोर्डाच्या अध्यक्षपदी जागा दिली. मुन्ना यादव नावचा एक व्यक्ती जो नागपूरमधील नामचीन गुंड आहे ज्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याला फडणवीसांनी कंस्ट्रक्शन बोर्डाचं अध्यक्ष बनवलं होतं’









