राष्ट्रवादीचाही ममतादीदींना पाठिंबा, पवार स्वत: बंगालमध्ये जाणार!

मुंबई तक

मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: पश्चिम बंगालमधून जाऊन ममता बॅनर्जी यांना आपलं समर्थन देण्यासाठी रॅली देखील घेणार असल्याचं समजतं आहे. पश्चिम बंगालची सत्ता काबिज करण्यासाठी […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मुंबई: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: पश्चिम बंगालमधून जाऊन ममता बॅनर्जी यांना आपलं समर्थन देण्यासाठी रॅली देखील घेणार असल्याचं समजतं आहे.

पश्चिम बंगालची सत्ता काबिज करण्यासाठी गेले अनेक महिने भाजपने आपली ताकद लावली आहे. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपला पाठिंबा तृणमूल काँग्रेसला दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये निवडणूक देखील लढविणार नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे भाजपला बंगालमध्ये रोखण्यासाठी आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ममता बॅनर्जींना साथ देत असल्याचं दिसतं आहे. (Ncp too will support mamata in west bengal sharad pawar will visit kolkata soon)

दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (4 मार्च) ट्विट करुन अशी माहिती दिली की, शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढवणार नाही. याआधी १७ जानेवारीला खासदार संजय राऊत यांनीच बंगाल विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. ममतादीदी बंगालची वाघीण आहेत. त्यांच्याविरोधात सगळे एकवटले आहेत त्यामुळे आम्ही निवडणूक न लढवता ममतादीदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असंही संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे.

“बंगालमध्ये BJP ने १०० जागा जिंकल्यास राजकीय अंदाज वर्तवणं सोडेन”

हे वाचलं का?

    follow whatsapp