तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात तीन-चार दिवसांत निर्बंध लागू होणार – नितीन राऊतांची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात येत्या तीन-चार दिवसांमध्ये निर्बंध लावण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली असून लवकरच याविषयी अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

ADVERTISEMENT

शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असताना राऊत यांनी निर्बंध लादण्यात येणार असल्याचे संकेत दिले.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पाऊल टाकले आहे. ७८ बाधितांचे सॅम्पल्स जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये यासंबंधी सर्व घटकांशी चर्चा केल्यानंतर हे निर्बंध लादले जातील अशी माहिती राऊत यांनी दिली. नवीन निर्बंधांनुसार जिल्ह्यात हॉटेलं रात्री १० ऐवजी ८ वाजेपर्यंत, दुकानं रात्री १० ऐवजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत तसेच बाजार शनिवार-रविवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

हे वाचलं का?

दुसऱ्या लाटेत आलेल्या अनुभवावरुन आपण हा निर्णय घेत असल्याचं राऊत यांनी सांगितलं. जेव्हा कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ व्हायला लागते त्यावेळी ती नवीन लाटेची चाहूल असते. नागपुरात कोरोनाची तिसरी लाट दाखल झाली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये निर्बंध लादण्याबद्दल निर्णय घेतला जाईल असं राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT