यंदाही दांडिया होणार नाहीच! नवरात्र उत्सवासाठी ‘अशी’ आहे राज्य सरकारची नियमावली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र असणार आहे. दुर्गा पूजा दिवस ते दसरा असा उत्सव नऊ दिवस साजरा होणार आहे. यंदाही कोरोनाचं सावट या उत्सवावर आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने नियमावली जारी केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उत्सव साजरा करणं योग्य होणार नाही असं सरकारने म्हटलं आहे. उत्सव साधेपणाने साजरा करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

उस्मानाबाद : नवरात्र उत्सवात भक्तांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाहीच, सर्व धार्मिक विधी पंरपरेनुसार होणार

काय आहे राज्य सरकारची नियमावली?

हे वाचलं का?

सार्वजनिक नवरात्र उत्सवासाठी मंडळांनी, महापालिका प्रशासन वा स्थानिक प्रशासन यांची पूर्वसंमती घेणं आवश्यक

कोव्हिड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून आणि महापालिका तसंच संबंधित स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणेच मंडप उभारले जावेत

ADVERTISEMENT

यावर्षीचा नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करायचा आहे, त्याच अनुषंगाने घरगुती आणि सार्वजनिक देवी मंडळांच्या मूर्तीची स्थापना करण्यात यावी

ADVERTISEMENT

घरगुती मूर्तीची कमाल मर्यादा 2 फूट आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तीची कमाल मर्यादा 4 फूट इतकी ठेवण्यात आली आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे शक्यतो धातूच्या मूर्तीचे किंवा घरातील संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे, ते शक्य नसल्यास देवीची शाडू मातीची पर्यावरणपूरक मूर्ती स्थापन करावी

नवरात्र उत्सवासाठी वर्गणी, स्वेच्छेने देणगी दिल्यास तिचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही किंवा लोक त्याकडे आकर्षित होणार नाही याची दक्षता घ्यावी. या जाहिरातींवर आरोग्य विषयक संदेश तसंच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेविषयी जनजागृतीही करण्यात यावी

गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक शिबीरं आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याविषयीचे प्रतिबंधात्मक उपाय यासंबंधीची जनजागृती करण्यात यावी.

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाई आणि फेसबुक इत्यादींद्वारे करण्यावर जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे

देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

आरती, भजन, किर्तन, आणि अन्य धार्मिक कार्यक्रम यांना गर्दी होणार नाही याची दक्षता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी घ्यायची आहे

मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त लोकांची गर्दी नसावी, तसेच मंडपात खाद्यपदार्थ किंवा पेयपान यांची कुठलीही सुविधा नसावी

देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीने विसर्नजन करण्यात यावं आणि फार वेळ त्या ठिकाणी थांबू नये.

महापालिका, विविध मंडळं, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी यांच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी आणि त्या ठिकाणी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात यावं

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहन हा कार्यक्रमही सर्वांनी नियम पाळून साजरा करावा. रावण दहनासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तींनीच कार्यक्रम स्थळी हजर राहावं. प्रेक्षक बोलवू नयेत. या ठिकाणी होणारा कार्यक्रम फेसबुकमार्फत लाईव्ह करावा.

कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT