NIA कडून वाझेंच्या टीममधील पोलीस अधिकाऱ्याची तब्बल 9 तास चौकशी, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याच Crime Intelligence Unit टीममधील API रियाझ काझी यांची NIA कडून काल (17 मार्च) तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. यावेळी रियाझ काझी यांना याबाबत काय-काय विचारणा करण्यात आली याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

ADVERTISEMENT

NIA कार्यालयातून रियाझ काझी हे साधारण 10.15 वाजता बाहेर पडले. यावेळी माध्यामांनी या चौकशीबाबत त्यांच्याकडे प्रतिक्रिया देखील मागितली. मात्र, रियाझ काझी यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे सूत्रांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझेंसोबत सीआययूच्या इतर अधिकाऱ्यांवर देखील NIAची करडी नजर आहे. त्यामुळे आता वाझेंनंतर आणखी कोण-कोण अडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

…Sachin Vaze हा विषय संपलेला नाही

हे वाचलं का?

रात्री 11 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा NIA कार्यालयात बोलवण्यात आलं होतं डॉक्टरांना

दरम्यान, काल रियाझ काझी हे एनआयए कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर रात्री 11.00 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं होतं. वाझेंच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना यावेळी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ADVERTISEMENT

NIA ने घेतला CIUमधील ‘या’ पोलीस अधिकाऱ्यांचा घेतलाय जबाब:

ADVERTISEMENT

Crime Intelligence Unit च्या इतर अधिकाऱ्यांचा देखील एनआयएने जबाब नोंदवून घेतलेला आहे. सचिन वाझे ज्या Crime Intelligence Unit मध्ये कार्यरत होते तेथील ACP नितीन अलकनुरे, पोलीस निरीक्षक मिलींद काथे, API रियाझ काझी, API प्रकाश होवळ आणि ३ कॉन्स्टेबलचा जबाब एनआयएकडून दोन दिवसांपूर्वीच नोंदवण्यात आलेला आहे.

…या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार, त्यांनी राजीनामा द्या – नारायण राणे

सचिन वाझे यांच्याविषयी आता संपूर्ण माहिती एनआयएकडून गोळा करण्यात येत आहे. अशावेळी त्यांच्या खात्यातील इतर अधिकाऱ्यांचा जबाब हा महत्त्वाचा ठरू शकतो.

NIA ने 15 मार्चला रात्री CIU च्या कार्यालयावर छापे देखील मारले होते. यावेळी एनआयएला सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज NIA च्या हाती लागलं आहे.

या छापेमारीत NIA ने लॅपटॉप, फोन, साकेत सोसायटीमधल्या सीसीटीव्ही फुटेजचा DVR ताब्यात घेतला आहे. सचिन वाझे यांनी आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला होता.

याव्यतिरीक्त सचिन वाझे यांच्या केबिनमधून अनेक महत्वाची कागदपत्र NIA च्या हाती लागलेली आहेत. आतापर्यंत या प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा NIA च्या हाती लागल्याचं बोललं जात आहे.

मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?

NIAकडून का सुरु आहे CIU च्या अधिकाऱ्याची चौकशी

सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओव्हाळ, पोलिस नाईक युवराज शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले हे सुरुवातीला साकेत सोसायटी येथे पोहचले.

तेव्हा त्यांनी तपासकामी सोसायटीतील CCTV फुटेज पाहिजे असं सोसायटी कार्यालयातील सदस्यांना सांगितलं. पण याबाबत लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही असं काहीच करु शकत नाही. असं सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.

त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणारं एक पत्र सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिलं होतं. या पत्राच्या शेवटी CIU DCB CID युनिटचे साहय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी यांनी सही केली आहे आणि दोन डीव्हीआर CCTV फुटेज जप्त करुन नेले होते. त्यामुळे याच फुटेजबाबत आणि संशयित स्कॉर्पिओ कारबाबत NIA ने CIU च्या अधिकाऱ्यांचा जबाब घेतला असल्याचे समजतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT