Gram panchayat results : नितेश राणेंनी निधीसाठी धमकी दिलेल्या गावात काय झालं?
सिंधुदुर्ग : “ग्रामपंचायतीला माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही, निधी वाटप माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा” असं म्हणतं भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रचारादरम्यान धमकी दिलेल्या नांदगावमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस या गावाचा निकाल आज जाहीर झाला असून इथे भाजपचा सरपंच निवडून […]
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग : “ग्रामपंचायतीला माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही, निधी वाटप माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा” असं म्हणतं भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रचारादरम्यान धमकी दिलेल्या नांदगावमध्ये काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस या गावाचा निकाल आज जाहीर झाला असून इथे भाजपचा सरपंच निवडून आला आहे.
ADVERTISEMENT
नितेश राणे यांनी गड राखला :
नांदगावमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. इथे भाजपचे ११ पैकी ९ आणि ठाकरे गटाचे २ सदस्य निवडून आले आहेत. तर सरपंचपदी भाजपप्रणित आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. भाजपचे रवीराज उर्फ भाई मोरजकर हे सरपंचपदी निवडून आले आहेत. ठाकरे गटाचे उपनेते गौरीशंकर खोत यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी नितेश राणे नांदगावमध्ये प्रचारासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी “ग्रामपंचायतीला माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर या गावच्या विकासाला निधी देणार नाही, निधी वाटप माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा” असा धमकी वजा इशाराच मतदारांना दिला असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला होता. त्यावरुन त्यांना बऱ्याच टिकेला सामोरं जावं लागलं होतं.
हे वाचलं का?
काय म्हणाले नितेश राणे?
जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल, त्यात गावाचा मी विकास करीन, नाहीतर करणार नाही स्पष्ट सांगतो. माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहेत. आपण लपाछपवीवाले नाही. राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक पोटात असं नाही. चुकून पण इथे माझ्या विचाराच्या सरपंच झाला नाही तर मी एकही रुपयांचा निधी देणार नाही. एवढी काळजी निश्चितपणे घेईन.
याला आता तुम्ही धमकी समजा नाहीतर अन्य काही. आपलं कॅलक्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात ठेवा, सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनचा निधी असो, ग्रामविकासचा विकास निधी असो, 25:15 चा निधी असो केंद्र सरकारचा निधी असो. मी सरकारमध्ये, सत्तेत असलेला आमदार आहे.
ADVERTISEMENT
जिल्हाधिकारी असो, पालकमंत्री असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असतील हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. अगरं नितेश राणेंच्या विचाराच्या सरपंच आला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण निकाल काय लागला?
-
एकुण ग्रामपंचायत – ३२५
भाजप – १८२
उद्धव ठाकरे गट – ७३
शिंदे गट – २४
ग्रामविकास पॅनल – ३९
महाविकास आघाडी – ०३
राष्ट्रवादी – ०१
अपक्ष – ०२
काॅगेस-००
निवडणुक झालेली नाही – ०१
एकुण – ३२५
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT