बापरे! उत्तर प्रदेशात आढळला Yellow Fungus चा पहिला रूग्ण
देशात एकीकडे ब्लॅक फंगसचे रूग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी ही कोरोना बरी झाल्यानंतरची नवी समस्या झाली आहे. अशात काही दिवसांपूर्वी व्हाईट फंगसचे रूग्णही आढळण्यास सुरूवात झाली होती. मात्र अशात आता Yellow Fungus चा पहिला रूग्ण आढळला आहे. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद या ठिकाणी Yesllow Fungus चा पहिला रूग्ण आढळला आहे. डॉ. बी. पी. त्यागी […]
ADVERTISEMENT
देशात एकीकडे ब्लॅक फंगसचे रूग्ण वाढत आहेत. म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी ही कोरोना बरी झाल्यानंतरची नवी समस्या झाली आहे. अशात काही दिवसांपूर्वी व्हाईट फंगसचे रूग्णही आढळण्यास सुरूवात झाली होती. मात्र अशात आता Yellow Fungus चा पहिला रूग्ण आढळला आहे. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद या ठिकाणी Yesllow Fungus चा पहिला रूग्ण आढळला आहे. डॉ. बी. पी. त्यागी यांनी ANI ला सांगितलं की संजय नगर भागातला एक रूग्ण माझ्याकडे आला होता. त्याची एंडोस्कोपी केल्यावर मला कळलं की त्या रूग्णाला ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगस आहे. यलो फंगस रेप्टाइल्समध्ये आढळतो. मी पहिल्यांदाच असा फंगस मानवी शरीरात पाहिला आहे असंही डॉ. त्यागी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Black Fungus बाबत डॉ. रवि गोडसे यांनी नेमकं काय म्हटलं आहे ? वाचा सविस्तर
यलो फंगसची लक्षणं काय?
हे वाचलं का?
यलो फंगस संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणं, भूक न लागणं, वजन कमी होणं ही प्राथमिक लक्षणं आहेत.
गंभीर प्रकरणांमध्ये जखमांमधून पू येणं आणि जखमा भरण्यासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ लागणं या समस्या उद्भवतात
ADVERTISEMENT
कधी कधी अवयव निकामी होणं, डोळ्याचा आकार छोटा होणं, डोळे कोरडे पडणं अशी लक्षणंही दिसून येतात.
ADVERTISEMENT
यलो फंगसची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे संसर्ग झाल्याचं तातडीने कळत नाही. शरीराच्या आत संसर्ग होतो तेव्हा हळूहळू लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे काहीही लक्षणं दिसली की तातडीने उपचारांसाठी रूग्णालयात जा असंही डॉक्टर त्यागी यांनी सांगितलं आहे.
काळी बुरशी आजाराची लक्षणं, उपचाराबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
यलो फंगसचा संसर्ग होण्यामादील मूळ कारण म्हणजे अस्वच्छता आणि घाण. घरातील तसेच शारीरिक स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. घरामधील जुने आणि खाण्यास योग्य नसणारे अन्नपदार्थ आणि विष्ठा, मलमूत्र वेळोवेळी स्वच्छ करणे आणि घरात घाण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
अस्वच्छतेमुळे घरामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला वाव मिळतो. घरामध्ये किती दमटपणा आहे यावरही यलो फंगसच्या संसर्ग होऊ शकतो की नाही याचा अंदाज बांधता येतो. घरात दमटपणा अधिक असेल तर बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला अधिक वाव मिळतो. घरामध्ये ३० ते ४० टक्के दमट वातावरण हवं. जास्त बाष्प असणाऱ्या वातावरणामध्ये राहण्यापेक्षा दमटपणा कमी असलेल्या वातारवणात राहणं आरोग्यासाठी अधिक फायद्याचं असतं असंही तज्ज्ञ सांगतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT