नर्सला लग्नाचं आमिष दाखवून २ लाख उकळले, बोगस डॉक्टर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका बोगस डॉक्टरला अटक केली आहे. या आरोपीने फेसबूकवर आपलं बनावट प्रोफाईल तयार करत मुंबईतील एका नर्ससोबत ओळख वाढवून तिच्यासोबत लग्न करण्यात स्वारस्य दाखवलं. यानंतर तिचा विश्वास संपादन करुन या डॉक्टरने २ लाख रुपये उकळले. सैफुद्दीन मुजीबूर सरदार असं या आरोपीचं नाव असून मरीन ड्राईव्ह पोलीस […]
ADVERTISEMENT
– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका बोगस डॉक्टरला अटक केली आहे. या आरोपीने फेसबूकवर आपलं बनावट प्रोफाईल तयार करत मुंबईतील एका नर्ससोबत ओळख वाढवून तिच्यासोबत लग्न करण्यात स्वारस्य दाखवलं. यानंतर तिचा विश्वास संपादन करुन या डॉक्टरने २ लाख रुपये उकळले.
सैफुद्दीन मुजीबूर सरदार असं या आरोपीचं नाव असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या पथराने पश्चिम बंगालमधील सेंट्रल हावडा जिल्ह्यातून त्याला अटक केली आहे.
हे वाचलं का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्यावर विश्वास बसावा यासाठी बनावट ई-मेल आयडीने आपलं खात तयार करत फेसबूक प्रोफाईलवरही आपण मँचेस्टर येथील डॉक्टर असल्याचं भासवलं. या घटनेतील पीडित नर्स ही मुळची आसामची असून ती मुंबईत एका ज्येष्ठ व्यक्तीच्या घरी नर्सचं काम करते. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने Togo Williams नावाने फेसबूकवर रिक्वेस्ट पाठवली. यानंतर दोघांमध्ये ओळख वाढल्यानंतर रोज संभाषण व्हायला लागलं. एक दिवस आरोपीने नर्सला लग्नाची मागणी घातली.
आपल्यावर विश्वास बसावा यासाठी आरोपीने नर्सला मी तुझ्याकरता महागडं गिफ्ट पाठवलं आहे. ते कस्टममधून बाहेर काढण्यासाठी काही फी भरावी लागेल असं सांगितलं. इतकच नव्हे तर आरोपीच्या एका महिला साथीदाराने नर्सला फोन करुन पैसे भरण्यासाठी सांगितलं. यावर विश्वास ठेवत नर्सने पैसे भरल्यानंतर हातात काहीही न लागल्यामुळे तिला आपली फसवणूक झाल्याचं कळलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आरोपीला अटक केली असून ते आता त्याच्या महिला साथीदाराच्या शोधात आहेत.
ADVERTISEMENT
Rape Case: बीड जिल्हा हादरला, वासनांध 23 वर्षीय तरुणाचा 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT