पालघरच्या समुद्रात 80 हजार लिटर इंधन असलेल्या बार्जमधून सुरु झाली गळती
पालघरच्या समुद्रात 80 हजार लिटर इंधन असलेल्या बार्जमधून इंधन गळती सुरू झाली आहे. या बार्जवरच्या 137 कामगारांना सुखरूप सोडवण्यात आलं आहे. मात्र बार्ज समुद्रातच अडकली आहे. गेल्या अकरा दिवसांपासून ही बार्ज समुद्रात अडकली आहे. आता या बार्जमधून इंधन गळती सुरू झाली आहे. ही गळती समुद्राच्या पाण्यात होत असल्याने समुद्री जिवांना धोका निर्माण झाला आहे. याविरोधात […]
ADVERTISEMENT
पालघरच्या समुद्रात 80 हजार लिटर इंधन असलेल्या बार्जमधून इंधन गळती सुरू झाली आहे. या बार्जवरच्या 137 कामगारांना सुखरूप सोडवण्यात आलं आहे. मात्र बार्ज समुद्रातच अडकली आहे. गेल्या अकरा दिवसांपासून ही बार्ज समुद्रात अडकली आहे. आता या बार्जमधून इंधन गळती सुरू झाली आहे. ही गळती समुद्राच्या पाण्यात होत असल्याने समुद्री जिवांना धोका निर्माण झाला आहे. याविरोधात आता येथील कोळी बांधवांनी आवाज उठवला आहे. जर ही गळती लवकरात लवकर थांबवली गेली नाही तर आंदोलन करू असा इशारा मच्छिमार बांधवांनी दिला आहे. इंधन गळती सुरू झाल्याने समुद्राच्या पाण्यावर तेलकट तवंग निर्माण झाला आहे. हा तवंग माशांसाठी घातक ठरणारा आहे असंही कोळी बांधवांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Tauktae Cyclone चा फटका बसलेलं Barge P 305 सापडलं
काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 17 मे रोजी तौकताई चक्रीवादळ आलं होतं. या वादळात P 305 नावाची बार्ज बुडाली. या अपघातात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. उर्वरित लोकांना सोडवण्यात यश आलं. जेव्हा हे चक्रीवादळ आलं होतं तेव्हा वेगवेगळ्या बार्ज आणि बोटींवर अंदाजे 800 हून जास्त लोक होते. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 200 किमी इतका प्रचंड होता आणि समुद्रात उंचच उंच अशा लाटा उसळत होत्या. भारतीय नौदलाने धाडसी बचाव मोहीम राबवून अनेकांचे प्राण वाचवले.
हे वाचलं का?
समुद्राच्या तळापासून तेल काढण्याचे काम जगभर केले जाते. हे तांत्रिकदृष्ट्या कठीण काम आहे. तेल विहिरींमधून तेल काढण्याची सिस्टम समजण्यापूर्वी या विहिरीचे काही भाग समजून घ्यावे लागतील. सर्व प्रथम हे जाणून घ्या की, तेल विहिरी पूर्णपणे समुद्रावर फ्लोटिंग स्ट्रक्चर आहेत. म्हणजे, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा सर्वकाही किनाऱ्यावर आणले जाऊ शकते. खरं तर तेल विहिरींवर वर्षांनुवर्षे काम करता सुरु असतं. मूलतः तेलाच्या विहिरींमध्ये दोन प्रकारच्या रचना असतात. एक तेल काढण्यासाठी ड्रिलिंग केलं जातं. दुसरा तो जिथे काम करणारे लोक राहतात. ज्याला ओएनजीसीच्या तेल विहिरी म्हणून मानलं जातं.
त्याचा एक भाग म्हणजे सागर भूषण तेल रिग. म्हणजेच असा भाग जिथे विहिरीतून तेल काढलं जातं. येथे ड्रिलिंग केले जाते. इथे कच्च तेलं काढून ते प्रक्रियेसाठी पुढे पाठविले जाते. हेच तेल ऑईल रिफायनरीमध्ये पोहचल्यावर तुम्हा-आम्हाला डिझेल-पेट्रोलच्या स्वरूपात उपलब्ध होतं.
ADVERTISEMENT
दुसरा भाग म्हणजे बार्ज पी 305, कार्गो बार्ज जीएएल कन्स्ट्रक्टर, बार्ज एसएस -3 आहेत. या भागात बार्ज पी 305 आणि बार्ज एसएस -3 वर लोकं राहतात. कार्गो बार्ज हे मालवाहतुकीसाठी असतं. याचा अर्थ असा की कच्चे तेल किनाऱ्यावर आणणे किंवा तेलाच्या विहिरींसाठी लागणारी अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक करणे अशी कामे याद्वारे केली जाते.
ADVERTISEMENT
आता पालघरच्या समुद्रात इंधनाचा मोठ्या प्रमाणावर साठा असलेली बार्ज अडकली आहे. या बार्जमधून मोठ्या प्रमाणावर तेल गळती होते आहे. ही गळती थांबली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा कोळी बांधवांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT