नवा व्हेरिएंट आढळल्यानंतर मोदींनी घेतली तातडीची बैठक; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
कोरोनाच्या सावटातून आणि दुसऱ्या लाटेतून जग सावरतं आहे. अशात ओमिक्रॉन या विषाणूचं संकट जगाला भेडसावण्याची चिन्हं आहेत. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं ‘ओमिक्रॉन’ असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत, आज दिल्लीतही पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली. आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची माहिती घेतली. यामध्ये भारतात […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या सावटातून आणि दुसऱ्या लाटेतून जग सावरतं आहे. अशात ओमिक्रॉन या विषाणूचं संकट जगाला भेडसावण्याची चिन्हं आहेत. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं ‘ओमिक्रॉन’ असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत, आज दिल्लीतही पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली.
आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची माहिती घेतली. यामध्ये भारतात कोणते व्हेरिएंट आहेत? त्याबद्दल जाणून घेतलं. विदेशी पर्यटकांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावेत असंही म्हटलं आहे.
आधी अल्फा, मग बीटा, मग डेल्टा आणि आता ‘ओमिक्रॉन..’कोरोनाच्या नव्या विषाणूंची ही साखळी थांबता थांबेना..आता आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूनं सध्या सगळ्या जगाची चिंता वाढवली आहे. WHO नं या व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीत टाकलंय. अनेक देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. भारतातही आज पंतप्रधान मोदींनी या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली.










