Maharashtra Legislative Assembly: ‘विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आमचं निलंबन’, गिरीश महाजनांचा मोठा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेतील 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहात थेट विधानसभा अध्यक्षांच्या समोर माईकची मोडतोड आणि चेंबरमध्ये घालण्यात आलेल्या गोंधळामुळे विरोधी पक्षातील आमदारांवर ही कारवाई करण्यात आलं असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे असं असलं तरीही ही कारवाई फक्त विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लक्षात घेऊन करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया भाजपचे निलंबित आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे.

पाहा गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘अतिशय अयोग्य आणि जाणीवपूर्वक केलेली कारवाई आहे. विरोधी पक्षांची संख्या कमी व्हावं, संख्याबळ कमी व्हावं या हेतून ती कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्याचं कारण काहीही नव्हतं. दोन्ही पक्षाचे आमदार तिथे होते. ते आमनेसामने भिडले होते. आम्ही तिथे गेलो ही प्रथा असते.’

‘मला वाटतं सीसीटीव्ही कॅमेरे तिथे आहे. ते तपासून पाहा. कोण काय बोललं.. तुमचे आमदार काय बोलले, अध्यक्ष काय बोलले, आम्ही काय बोललो कोणी तिथे आवराआवर केली हे सगळं लाइव्ह आहे.’

ADVERTISEMENT

‘मी तर सगळ्यांच्या मध्ये अक्षरश: आडवाच उभा होतो. देवेंद्रजी उभे होते माझ्यासोबत असं असताना आम्हाला टार्गेट करावं. आम्हाला निलंबित करावं मला वाटतं ही गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे.’

ADVERTISEMENT

‘आमच्या दृष्टीने हा काळा दिवसच आहे. काही कारण नसताना अनेक वेळा अशा गोष्टी घडल्या आहेत. पण तुमचेच आमदार आम्हाला येऊन भिडले आणि परत आम्हालाच निलंबित कराल तर तुमच्या आमदारांना देखील निलंबित करा. जे तुमच्या केबिनमध्ये शिवीगाळ करत होते आम्हाला घाण-घाण त्यांना तुम्ही काही नाही करणार का?’

‘खरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी हे सगळं करण्यात आलं आहे. आम्हाला तसाच संशय येत आहे. विरोधी पक्षाचं संख्याबळ कसं कमी होईल त्यासाठी केलेला हा सगळा केविलवाणा प्रकार आहे.’ असं म्हणत गिरीश महाजन यांनी सरकारवरच टीका केली.

विधानसभेत नेमकं काय घडलं?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये प्रचंड खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

भास्कर जाधव (तालिका अध्यक्ष) यांनी स्वत: सांगितलं की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजप आमदारांनी माझ्या चेंबरमध्ये घुसून माझ्या आई-बहिणीवरुन मला शिव्या दिल्या आणि धक्काबुक्की केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील आमदारांना रोखलं नाही.’ असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

Vidhan Sabha 2nd Session: ‘सभागृहात राडा, चेंबरमध्ये शिवीगाळ…’ Bhaskar Jadhav यांनी सांगितलेला घटनाक्रम जसाच्या तसा!

यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि नंतर तो प्रस्ताव सभागृहात मंजूर देखील करण्यात आला. त्यामुळे आता भाजपचं संख्याबळ 106 वरुन थेट 94 वर येऊन पोहचलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT