मी तुकडे तुकडे गँगचा सदस्य आणि…; मोदींच्या टीकेला चिदंबरम यांचं प्रत्युत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस तुकडे-तुकडे गँगचं नेतृत्व करत असल्याची टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी उत्तर दिलं. यावेळी चिदंबरम यांनी विविध मुद्द्यांवरूनही सरकारवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

अर्थसंकल्पावर चर्चा करत असतानाच पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘मी तुकडे-तुकडे गँगचा सदस्य आहे आणि मी त्यांची काळजी करत नाही. कारण खासदाराने प्रश्न विचारला होता की, तुकडे-तुकडे गँगचे सदस्य कोण आहेत? त्यावर मंत्र्यांनी सांगितलं होतं की, आमच्याकडे तुकडे-तुकडे गँगबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.’

आम्ही सुपर स्प्रेडर आहोत असं कसं बोललात?; सुप्रिया सुळेंचा मोदींना सवाल

हे वाचलं का?

‘तुकडे-तुकडे गँगची माहिती उपलब्ध नाहीये. ऑक्सिजनअभावी झालेल्या मृतांचा आकडा उपलब्ध नाहीये. गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांची माहिती उपलब्ध नाहीये. किती स्थलांतरित मजूर घरी गेले याचीही माहिती उपलब्ध नाहीये. 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायला हवं होतं. त्याचीही माहिती उपलब्ध नाहीये. हे नो डेटा अवेलेबल सरकार म्हणजेच एनडीए सरकार आहे’, असं सांगत चिदंबरम यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं.

काँग्रेसवर टीका करताना मोदी काय म्हणाले होते?

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला. ‘विभाजनाच्या मानसिकतेनं काँग्रेसच्या घर केलं आहे. काँग्रेस निघून गेले, पण त्यांचा हा वारसा हे (काँग्रेस) पुढे चालवत आहे. काँग्रेस आज तुकडे-तुकडे गँगची लीडर बनली आहे. लोकशाही पद्धतीने आम्हाला (भाजप) रोखता येत नाही म्हणून बेशिस्तपणे आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना इथेही त्यांना अपयशच येईल’, असं मोदी म्हणाले होते.

ADVERTISEMENT

1975 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा गळा घोटला ते आता लोकशाहीच्या गप्पा मारत आहेत-मोदी

‘अर्बन नक्षलवादाच्या जाळ्यात अडकलीये’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 फेब्रुवारी) राज्यसभेत बोलताना पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं. ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाच्या जाळ्यात अडकली आहे. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अर्बन नक्षलवाद्यांनी ताबा मिळवला आहे. देशासाठी हा चिंतेचा विषय आहे. अर्बन नक्षलवादाने काँग्रेसच्या दुर्दशेचा फायदा उचलला. आम्ही इतिहास बदलू इच्छित नाही, तर काही लोकांची स्मरणशक्ती वाढवू इच्छितो,’ अशी टीका मोदींनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT