वागणं टग्यासारखं आणि रडणं बाईसारखं ! पडळकरांचा अजित पवारांवर पलटवार
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. बारामतीच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यानंतर टोला लगावणाऱ्या अजित पवारांना गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. टगेगिरीची भाषा अजित पवारांना शोभत नाही, वागायचं टग्यासारखं आणि रडायचं बाईसारखं ही अजित पवारांची गत असल्याचं पडळकरांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. Pandharpur By-election: उपमुख्यमंत्री अजित पवारांची […]
ADVERTISEMENT
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. बारामतीच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाल्यानंतर टोला लगावणाऱ्या अजित पवारांना गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. टगेगिरीची भाषा अजित पवारांना शोभत नाही, वागायचं टग्यासारखं आणि रडायचं बाईसारखं ही अजित पवारांची गत असल्याचं पडळकरांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Pandharpur By-election: उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, गल्ली-बोळात जाऊन करतायेत प्रचार
“माझ्यावर टीका करण्याआधी अजित पवारांनी स्वतःची लायकी काय आहे हे इथल्या लोकांना सांगायला हवं. माझं डिपॉझिट जप्त झालं हे जगजाहीर आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर मी माझा हक्काचा मतदारसंघ सोडून बारामतीत येऊन निवडणूक लढलो. लोकांनी मला नाकारलं. अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारही मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढला. तिकडेही अडीच लाख मत त्याच्या विरोधात गेली. तेव्हा काय झालं?” असा प्रश्न विचारत पडळकरांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हे वाचलं का?
‘आपलं नाणं खणखणीत, कारण आपल्या मागं चुलता उभा हाय’, अजित पवारांचा खास VIDEO
पंढरपूरमधील सभेत बोलत असताना अजित पवारांनी पडळकर आणि हर्षवर्धन पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाल्याचा दाखला देऊन टीका केली होती. यावर उत्तर देताना पडळकर यांनी, टगेगिरीची भाषा अजित पवारांना शोभत नाही. बोलणं टग्याचं आणि रडणं बाईसारखं अशी अजित पवारांची गत आहे. इडीची नोटीस आल्यानंतर तुम्हाला रडताना राज्याने पाहिलेलं आहे. अजित पवारांचं राजकारणच चुलत्यांच्या जीवावर आहे पण आमचं राजकारण हे बारा बलुतेदार आणि गोरगरिबांच्या पाठींब्यावर असल्याचं पडळकर म्हणाले.
ADVERTISEMENT
गेल्या काही दोन दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून आहेत. यावर विचारलं असता…अजित पवारांवर एवढी काय वाईट वेळ आली की त्यांना पंढरपुरात येऊन तळ ठोकून बसावं लागतंय. गल्लीबोळात चहा-पोहे खाण्याची वेळ आली आहे? याआधी राज्याचा उप-मुख्यमंत्री अशा पद्धतीने प्रचारासाठी मंगळवेढ्यात आला होता का? माझ्यावर टीका करण्यासाठी पवारांनी या भागातील ३५ गावांना पाणी का दिलं नाही याचं उत्तर द्यावं अशी मागणी पडळकर यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT