Parambir Sing यांच्या अडचणी वाढल्या, ठाणे पोलिसांकडून लुक आऊट नोटीस जारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या विरोधात माजी ठाणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. कोपरी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यावर खंडणी आणि इतर गुन्हे दाखल आहेत. परमबीर सिंग यांच्यासोबत खंडणी प्रकरणातील इतर मोठ्या पोलीस अधिकारी आणि आरोपींच्या विरोधातही लुक आऊट नोटीस लवकरच जारी करण्यात येणार आहे. यामुळे आता परमबीर सिंग आणि इतरांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

ADVERTISEMENT

30 जुलैला दाखल झाला होता गुन्हा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण त्यांच्यासह सात जणांवर FIR दाखल करण्यात आला होता. एकूण 28 लोकांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली. केतन मनसुखलाल तन्ना यांनी 54 वर्षीय व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आहे. याआधीही परमबीर सिंग यांच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आली.

हे वाचलं का?

23 जुलैला झाला होता गुन्हा दाखल

परमबीर सिंग ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पराग मणेरे हे ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबईत बदली झाल्यानंतर पराग मणेरे यांनाही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बढती देण्यात आली होती. पुनामिया आणि जैन यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याआधीच अटक केली आहे.

ADVERTISEMENT

शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. शरद अग्रवाल हा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेले बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या आहे. शरद अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपये वसूल करत एका जमिनीच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करायला लावली. परमबीर सिंग ठाणे पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांच्या बंगल्यावर हा प्रकार घडल्याचं शरद अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

केतन मनसुखलाल तन्ना या 54 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. केतन तन्ना आणि त्यांच्या पत्नीला खंडणीसाठी धमकावलं जात होतं, असा आरोप तन्ना यांचे सह तक्रारदार सोनू जालान यांनी केला आहे. यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, रवी पुजारी, एन. टी. कदम, राजकुमार कोथमिरे आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचं जालान यांनी सांगितलं. आता ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी ाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT