कोणत्या नियमानुसार 19 राज्यसभा खासदारांना केलं निलंबित? काय आहे नियम 256?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session 2022) सुरू आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहाचे कामकाज वारंवार थांबवले जाते किंवा काही काळासाठी कामकाज तहकूब केले जाते, असे अनेकदा घडते. यावेळीही तेच होत आहे. यासोबतच राज्यसभेत गदारोळ आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी सभागृहातील 19 खासदारांना आठवडाभराच्या उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभा खासदारांना विशेष नियम 256 अंतर्गत निलंबित करण्यात आले आहे, त्यानंतर ते कामकाजात भाग घेऊ शकणार नाहीत. आता खासदारांच्या या निलंबनाला विरोध होत आहे.

ADVERTISEMENT

अशा परिस्थितीत राज्यसभेच्या खासदारांना कोणत्या कारणांमुळे निलंबित केले जाऊ शकते आणि निलंबनाच्या वेळी अनेकदा नमूद केलेला 256 नियम कोणता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच 256 च्या नियमात काय म्हटले आहे? हे आपण जाणून घेऊयात.

राज्यसभेच्या खासदाराला कोण निलंबीत करु शकते?

सभागृहाचे सभापती राज्यसभेच्या खासदाराला निलंबीत करू शकतात आणि त्यांना राज्यसभा सोडण्याचे निर्देश देऊ शकतात. एकदा जर सभापतींनी खासदाराला बाहेर जाण्याचे आदेश दिले तर सदस्याला तात्काळ सभागृहाबाहेर जावे लागते.

हे वाचलं का?

सदस्याला राज्यसभा सभागृहातून कधी बाहेर काढले जाते?

सभागृहाच्या कामकाजाबाबत सभापती हा निर्णय घेऊ शकतात. नियमांनुसार, सभापती कोणत्याही सदस्याचे वर्तन असंसदीय वाटले तर त्याला राज्यसभेतून ताबडतोब बाहेर जाण्याचे निर्देश देऊ शकतात. जेव्हा सभापतींना योग्य वाटेल आणि गरज वाटेल तेव्हा ते राज्यसभेच्या सदस्याला निलंबित करू शकतात. हे सर्व सभापतींच्या अधिकार क्षेत्रात येत असते. यासोबतच राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणून वारंवार आणि जाणूनबुजून राज्यसभेच्या नियमांचा गैरवापर करणाऱ्या खासदाराची हकालपट्टीही होऊ शकते.

दुसरा नियम काय आहे?

दुसरी अट अशीही आहे की जर एखादा सदस्य सभागृहात गोंधळ घालत असेल तर सभापती त्याचा नावाचा उल्लेख करतात. जर त्याचं वागणं असंसदीय असेल तर सभापती एक निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन संबंधित सभागृहात मतासाठी टाकतात. सर्व सदस्य प्रस्तावावर आवाजी मतदान करतात आणि संबंधित सदस्याला निलंबीत केले जाते.

ADVERTISEMENT

निलंबन किती काळ टिकू शकते?

सभापती एखाद्या सदस्याला अधिवेशन संपेपर्यंत राज्यसभेच्या कामकाजातून निलंबित करू शकतात किंवा अधिवेशनाच्या काही दिवसांसाठी ते निलंबन लागू राहू शकते. राज्यसभेतील खासदारांच्या निलंबनाच्या वेळेवरून यापूर्वीही गदारोळ झाला होता. राज्यसभेच्या नियम क्रमांक 255 मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. एखाद्या खासदाराला सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले तर तो आदेश त्या दिवसापुरता मर्यादित असेल.

ADVERTISEMENT

हे निलंबन पुन्हा माघारी घेता येऊ शकते का?

हो हे होऊ शकते. पण, हेही राज्यसभेच्या सभापतींच्या इच्छेनुसार होईल. निलंबित सदस्यांनी माफी मागितल्यानंतर ते मागे घेता येईल. तसे, निलंबनाविरोधातही सभागृहात प्रस्ताव आणला जाऊ शकतो. तो पास झाल्यास, निलंबन आपोआप मागे घेतले जाते.

सभागृह स्थगित किंवा तहकूब करता येते?

राज्यसभेच्या खासदारांशी संबंधित नियम क्रमांक 257 नुसार, राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्याचा किंवा बैठक स्थगित करण्याचा अधिकार सभापतींना आहे. राज्यसभेत गंभीर अव्यवस्था निर्माण झाल्यास, सभापतींना तसे करणे आवश्यक वाटल्यास, राज्यसभेचे कामकाज तहकूब करू शकतात किंवा त्यांनी दिलेल्या वेळेसाठी कोणतीही बैठक स्थगित करू शकतात.

लोकसभेमध्ये वेगळे नियम

लोकसभेत नियम 373 आणि 374 द्वारे अध्यक्षांना हा अधिकार मिळतो. लोकसभेच्या बाबतीत नियम क्रमांक 373 नुसार – जर लोकसभेच्या अध्यक्षांना असे वाटत असेल की कोणताही खासदार सतत सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्याला त्या दिवसासाठी किंवा उर्वरित दिवसांसाठी सभागृहातून बाहेर काढू शकतात. संपूर्ण सत्रासाठी देखील निलंबित केले जाऊ शकते. एखादा सदस्य सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळा आणत असल्याचे अध्यक्षांना वाटत असेल तर त्याला उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित केले जाऊ शकते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT