असं काय आहे या फोटोत की अॅपल कंपनीही पडली प्रेमात? जाणून घ्या यामागची कहाणी
राज्यात आणि देशभरात कोल्हापूरकरांची एक वेगळीच ओळख असते. आपल्या रांगड्या शैलीसाठी प्रसिद्ध असणारे कोल्हापूरकर जिथे जाईल तिकडे आपली छाप पाडतात. कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल अशी एक घटना घडली आहे, ज्यात प्रज्वल चौगुले या तरुणाने काढलेल्या एका फोटोची भुरळ थेट मोबाईल क्षेत्रातली दादा कंपनी ‘अॅपल’ला पडलेली आहे. अॅपल कंपनीच्या वतीने शॉट ऑन आयफोन नावाची एक फोटोग्राफी स्पर्धा […]
ADVERTISEMENT
राज्यात आणि देशभरात कोल्हापूरकरांची एक वेगळीच ओळख असते. आपल्या रांगड्या शैलीसाठी प्रसिद्ध असणारे कोल्हापूरकर जिथे जाईल तिकडे आपली छाप पाडतात. कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल अशी एक घटना घडली आहे, ज्यात प्रज्वल चौगुले या तरुणाने काढलेल्या एका फोटोची भुरळ थेट मोबाईल क्षेत्रातली दादा कंपनी ‘अॅपल’ला पडलेली आहे.
ADVERTISEMENT
अॅपल कंपनीच्या वतीने शॉट ऑन आयफोन नावाची एक फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यात सर्वोत्तम फोटो काढणाऱ्या जगभरातील 10 फोटोंचा सन्मान करण्यात आला, ज्यात कोल्हापूरच्या प्रज्वलचाही समावेश आहे.
कोळ्याच्या जाळ्यावर पडलेलं दवबिंदू प्रज्वलने आपल्या आयफोन 13 प्रो मध्ये टिपलं आहे. प्रज्वलच्या या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा असून अॅपल कंपनीनेही या फोटोचा सर्वोत्तम 10 फोटोंमध्ये समावेश केला आहे.
हे वाचलं का?
जगभरातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ज्यात चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड, अमेरिका यासारख्या देशांमधून 10 स्पर्धकांची निवड करण्यात आली.
कोल्हापूरच्या प्रज्वलने घेतलेल्या फोटोत निसर्गाचं एक वेगळं रुप समोर आलं आहे. आपल्या फोटोबद्दल प्रतिक्रीया देत असताना प्रज्वल म्हणाला, “मी निसर्गप्रेमी आहे आणि मला नेहमी माझ्या आयफोनसोबत बाहेर फिरताना फोटोग्राफी करायला आवडतं. बाहेर फिरायला गेलेलो असताना कोळ्याच्या जाळ्यावर दवबिंदूंनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या दवबिंदूमुळे कोळ्याचं जाळं एखाद्या मोत्याच्या हाराप्रमाणे वाटत होतं. हे सौंदर्य जगासमोर यावं म्हणून हा फोटो मी काढला आणि त्या फोटोला इतक्या मोठ्या व्यासपीठावर प्रसिद्धी मिळाली हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT