Russia-Ukrain war : पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; झेलेन्स्कींनाही दिला सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही सुरूच असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधानांनी आधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की आणि नंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी जवळपास ५० मिनिटं चर्चा केली.

ADVERTISEMENT

रशियाकडून करण्यात आलेल्या आक्रमणानंतर रशियात युद्ध स्थिती निर्माण झाली असून, आज १२व्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या प्रमुखांशी संवाद साधत चर्चेतून तोडगा काढण्याचं आवाहन केलं.

पंतप्रधान मोदी यांनी आधी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली. सकाळी ११.३० वाजता मोदींनी आणि झेलेन्स्की यांच्यात चर्चा झाली. जवळपास ३५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा चालल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हे वाचलं का?

यु्क्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धस्थितीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी झेलेन्स्की यांच्याबरोबर चर्चा केली. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या चर्चेबद्दल मोदींनी कौतूक केलं. त्याचबरोबर देशांनी चर्चेतून प्रश्न सोडवण्यावर जोर द्यावा, असा सल्ला मोदींनी झेलेन्स्कींना दिला. त्याचबरोबर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून केल्या गेलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी युक्रेनचे आभार मानले. सुमी शहरात अडकून पडलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी युक्रेननं मदत करावी, अशी विनंती मोदींनी यावेळी केली.

पुतिन यांना झेलेन्स्कींसोबत चर्चा करण्याचा सल्ला

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होल्दिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही चर्चा केली. युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या स्थितीबद्दल उभय नेत्यांमध्ये जवळपास ५० मिनिटं चर्चा झाली. यावेळी पुतिन यांनी युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळांमध्ये सुरू असलेल्या चर्चेबद्दल मोदींना माहिती दिली.

ADVERTISEMENT

दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये सुरू असलेल्या चर्चेबरोबरच राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करावी, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना दिला. मोदी यांनी सुमी शहरासह युक्रेनमधील इतर भागात हल्ले थांबवून सुरक्षित मार्ग सुरू केल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.

सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा मुद्दाही यावेळी मोदींनी पुतिन यांच्यासोबतच्या चर्चेत उपस्थित केला. भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, असं आश्वान पुतिन यांनी मोदींना दिलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT