जुन्नर : पाच मित्रांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ४ आरोपी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ मित्रांनी दोन वर्षांपासून सामुहीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात पीडित मुलीच्या आईने गुरुवारी रात्री उशीरा आळेफाटा पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही इतर राज्यातली असून ती आपल्या पालकांसह आळेफाटा परिसरात राहत होती. याच परिसरात राहणाऱ्या आरोपींनी मुलीशी ओळख वाढवून तिचे अश्लील फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी दिली. २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या काळात हे पाचही आरोपी पीडित मुलीला तुझे फोटो व्हायरल करु आणि तुझ्या वडिलांना ठार मारु अशी धमकी देत विविध गाड्यांमध्ये नेऊन बलात्कार करायचे.

हे वाचलं का?

दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी निखील पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे, यश गाडेकर या आरोपींना अटक केली आहे. या चारही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार विरोधा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या ताब्यात असलेलं एक वाहनही ताब्यात घेतलं आहे.

Dahisar Murder : सराफाची हत्या करणारे ५ आरोपी अटकेत, मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT