पोलीसाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण, वसई रेल्वे स्थानकातला अपघात सीसीटीव्हीत कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई शहर आणि उपनगरातली लोकलसेवा ही प्रवाशांसाठी लाईफलाईन मानली जाते. परंतू अनेकदा हीच लाईफलाईन अनेक कारणांमुळे प्रवाशांच्या जीवावर बेतली आहे. वसई रेल्वे स्थानकात चालती लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्नात पाय घसरून रेल्वे ट्रॅकखाली येणाऱ्या एका महिलेचे प्राण पोलीसाच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत.

ADVERTISEMENT

१३ फेब्रुवारीला वसई रोड रेल्वे स्थानकात रात्री ७ वाजून ४३ मिनीटांच्या दरम्यान एक महिला प्लॅटफॉर्म नंबर पोलीस जवान निलेश पाटील हे कर्तव्य बजावत गस्त घालत होते. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरुन चर्चगेटला एक लोकल ट्रेन निघाली. यावेळी एक महिला ही धावती ट्रेन पकडण्यासाठी लगबगीने पुढे आली. ट्रेन सुरु झाल्याचं लक्षात येताच निलेश पाटील यांनी या महिलेला हात दाखवत चढू नका असं सांगितलं.

परंतू या महिलेने पोलिसांनी केलेली विनंती न ऐकता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात महिलेचा पाय घसरुन ती रेल्वे ट्रॅकखाली येत असतानात उपस्थित पोलीस जवान निलेश पाटीलने तात्काळ प्रसंगावधान राखत या महिलेला ओढून घेत तिचा जीव वाचवला. हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून महिलेचे प्राण वाचवणाऱ्या पोलीस जवानावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT