राजकारण हा सिरीयस बिझनेस, कोण काय बोललं यावरुन लगेच अंदाज बांधू नका – देवेंद्र फडणवीस
मराठवाडा मुक्तीसंग्रम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आजी-माजी आणि भावी वक्तव्यावरुन राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आज धुळ्यात एका कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे एकाच गाडीतून आले, ज्यामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळालं. परंतू देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. “आज मी आणि जयंत […]
ADVERTISEMENT
मराठवाडा मुक्तीसंग्रम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आजी-माजी आणि भावी वक्तव्यावरुन राज्यात चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आज धुळ्यात एका कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे एकाच गाडीतून आले, ज्यामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळालं. परंतू देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
ADVERTISEMENT
“आज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो याचा अर्थ वेगळा घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कोण काय बोलतं यावरुन लगेच अंदाज बांधू नका, सरकार अशी बनत नसतात. ही गोष्ट जेव्हा व्हायची असेल तेव्हाच होणार”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या.
नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळानिमित्त विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच महाविकास आघाडीचे नेते कार्यक्रमास उपस्थित होते.
हे वाचलं का?
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा स्वभाव थोडा विनोदी आहे’, काँग्रेसचे मंत्री असं का म्हणाले?
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीस काय म्हणाले?
ADVERTISEMENT
‘त्यांच्या शुभेच्छा ठिक आहे. चांगली गोष्ट आहे… राजकारणात कधीही काही होऊ शकते. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाही. भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहोत. आणि हे जे अनैसर्गिक गटबंधन झालं आहे, हे फार काळ चालू शकत नाही. कदाचिक मुख्यमंत्र्यांनाही याची जाणीव झाली असेल; अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT